Ajit Pawar : देशातील अनेर राज्यांना पाहिजे तेवढा कोळशाचा पुरवठा होत नाही. यामध्ये मला राजकारण करायचे नाही पण, कोळशाचे शॉर्टेज असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. लोडशेडींगच्या मुद्याबाबत मंत्रीमंडळाची बैठक झाली आहे. दर आठवड्यााल याबाबत आढावा घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोळशाचा तुटवडा भासत असल्याने परदेशातून कोळसा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच छत्तीसगडमध्ये कोळशाची खाण घेण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 
   
देशातील अनेक राज्यात सध्या विजेची टंचाई भासत आहे. त्या राज्यांना पाहिजे तेवढा कोळसा पुरवला जात नाही. यामध्ये मला कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही. पण कोळशाचे शॉर्टेज आहे. लोडशेडींग कमी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. कोळसासाठी छत्तीसगडमध्ये कोळशाची घेण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या विचारांचे सरकार आहे. याबाबत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही छत्तीसगड सरकारला मदत करण्यास सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.


कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीने बोलताना समाजतील कोणत्याही घटकाचा अवमान होईल असे बोलले न पाहिजे. प्रत्येकाने बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. कोणत्.याही समाजाचा अपमान झाला न पाहिजे, कोणी नाराज झाले न पाहिजे असे बोलले पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. 221 नागरी बँकांचा घोटाळा आणण्याचे काम मीडियाने केले. पण त्यापेक्षा जास्त ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 67 हजार कोटींचा घोटाळा या वर्षामध्ये झाला. ते प्रमाण एकूण घोटाळ्याच्या 90 टक्के आहे. पण नागरी बँकांच्या घोटाळ्याचे प्रमाण हे पाव टक्के आहे. पण मी कोणाचेही समर्थन करणार नसल्याचे यावेळी अजित पवार म्हणाले. कोणत्याही बँकांमध्ये तरी त्यामध्ये घोटाळा होता कामा नये, तो पैसा सुरक्षीत राहिला पाहिजे. जे कर्ज बुडवणार नाहीत त्यांनाचा कर्ज दिले पाहिजे असे अजित पवार म्हणाले. बदल्यांच्या संदर्भात गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे. तो त्यांचा अधिकार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. बदल्याच्या संदर्भात काहींना स्थगिती देण्यात आली आहे. मी मुंबईत जाऊन जोपर्यंत याबाबात माहिती घेत नाही तोपर्यंत सांगणे योग्य ठरणार नाही. 


कोरोनाच्या काळामध्ये मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले, त्यांच्यावर जास्त खर्च केला. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की,  माझं बिल मी दिले आहे. ज्या मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले त्यांना प्रश्न विचारा असे पवार यावेळी म्हणाले.



महत्त्वाच्या बातम्या: