सिंधुदुर्ग : अजित पवारांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न केले. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत, म्हणून ते काही जिल्हा बँक वाचवू शकणार नाहीत. ते स्वत: बेलवर बाहेर आहेत, उद्या ते तुरुंगात जातील अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. 


निलेश राणे म्हणाले की, "सिंधुदुर्ग जिल्हा बँक शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या हातातून केव्हाच गेलीय. म्हणून त्यांना एवढे एक्सटेन्शन अजित पवारांकडून मिळाले. अजित पवारांनी जिल्हा बँकेची निवडणूक पुढे जावी यासाठी जेवढी मदत केली. त्यांना ही बँक टिकवायची कशी हेच अजून कळलेलं नाही. त्यांनी जे काय जिल्हा बँकेत धंदे करून ठेवलेत ते उद्या आम्ही बसलो की उघड होणार. अजित पवार स्वतः बेल वर बाहेर आहेत. उद्या आत मध्ये जातील. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक केसेस आहेत. म्हणून अजित पवार काय त्याना वाचू शकणार नाहीत."


निलेश राणे म्हणाले की, "जिल्ह्याच्या राजकारणात सतीश सावंत असू दे किंवा असे शंभर सतीश सावंत असू देत. जिल्हा बँक त्यांच्या हातात राहू शकणार नाही. त्यांची तेवढी कुवत नाही. सतीश सावंत तेव्हा आमच्याकडे होते म्हणून त्यांना काही गोष्टी जमल्या, आता त्या जमणार नाहीत. कारण शिवसेनेतील अंतर्गत विरोध आणि मतदारांचा त्यांच्यावर असलेला अविश्वास हे सगळं गणित आमच्या पथ्यावर पडणार. त्यामुळे जिल्हा बँकेत आम्ही पैकीच्या पैकी जागा निवडूण आणणार."


मुख्यमंत्री घरी आयसीयूमध्ये- नारायण राणेंची टीका
महाविकास आघाडी सरकार गेली दोन वर्षात केवळ निवडणुका, पक्षबांधणीसाठी मंत्रालयात बैठका घेत आहेत. त्या बैठकांमध्ये मुख्यमंत्री मंत्रालयात आलेच नाहीत. त्यामुळे त्यांचा प्रशासनावर वचक नसून ते घरी आयसीयुमध्ये बसून आहेत, अशी टीका केंद्रीय नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. जैतापूरच्या मुद्यावर बोलताना राणे यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी बोलून उत्तर देईन असं उत्तर दिलं. तर खासदाराचं नाव ऐकलं तरी वीट येत असल्याचं राणे यांनी मेडिकल कॉलेजच्या प्रश्नाला उत्तर दिलं.


संबंधित बातम्या :