Ajit Pawar : कोणाच्याही खासगी आयुष्याबाबत बोलायचं नाही. तसेच कोणत्याही महिलेवर टीका करायची नाही, अशा सक्त सुचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना केल्या. मात्र, पक्षाची आणि नेत्यांची बदनामी कोणी करत असेल तर वेळ आल्यास त्याला आपल्याला शिंगावर घ्यावं लागेल असा इशाराही अजित पवारांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया शिबिरात अजित पवार बोलत होते. 
 
दरम्यान, आपण महायुतीत असलो तरी फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारधारा आपली असल्याचे अजित पवार म्हणाले. सेक्युलर हीच आपली विचारधारा आहे. त्यामुळं फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार आपण कधीच सोडणार नसल्याचे अजित पवार म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु या मां जिजाऊ आहेत. ही माझी नाही तर आमच्या पक्षाची भूमिका असल्याचे अजित पवार म्हणाले. 


मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता 


दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्चच्या पहिल्याच आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे अजित पवार म्हणाले. सोशल मीडियासाठीची शस्त्र सज्ज करण्याची वेळ आली आहे. आपल्या पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी सर्व मदत पक्ष करेल. वैद्यकीय अडचणी देखील सोडवल्या जातील असेही अजित पवार म्हणाले. 


विनाकारण कुणाला ट्रोल करु नका


दरम्यान, विनाकारण कुणाला ट्रोल करु नका. जर आपल्याला कोणी काही बोलत असेल तर रीतसर पोलीस तक्रार करा असेही अजित पवार म्हणाले. कुणावरही कायदेशीर कारवाई करण्याची वेळ आली तर पक्षाकडून मदत केली जाईल. पक्ष म्हणून मी पाठीशी कायम उभा राहील असेही अजित पवार यावेळी कार्यकर्त्यांना म्हणाले. जर पोलिसांनी सांगितल की, आपल्याच कार्यकर्त्यांची चूक आहे तर पोलिसांना टायरमध्येही घालायला लावेल असा इशाराही अजित पवार यांनी दिला.


महत्वाच्या बातम्या:


Ajit Pawar on Sharad Pawar : शरद पवारांना पाडलं पाहिजे; पक्ष आणि चिन्ह मिळताच अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना थेट कानमंत्र!