Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य झाल्याने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे यांनी आपलं आमरण उपोषण संपवलं. जरांगे यांचे उपोषण मागे घेताना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) , मंगल प्रभात  लोढा (Mangal Prabhat Lodha) देखील हजर आहे. मात्र, याचवेळी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे एकही मंत्री यावेळी उपस्थित नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळाला होता.


पहाटेपर्यंत चालेल्या मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर मराठा आरक्षणाबाबत एकमत झाले. याबाबत सरकराने तातडीने जीआर देखील काढले आहेत. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण मागे घेणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, मुख्यमंत्री यांचे हस्ते ज्यूस पिऊन जरांगे यांनी आपले उपोषण संपवले. यावेळी सत्तधारी पक्षातील अनेक मंत्री देखील व्यासपीठावर उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मात्री दीपक केसरकर, गिरीश महाजन, मंगल प्रभात लोढा असे भाजप आणि शिंदे गटाचे मंत्री यावेळी हजर असल्याचे पाहायला मिळाले. याचवेळी सत्तेत असलेल्या अजित पवार गटाचे एकही मंत्री यावेळी पाहायला मिळाले नाही. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. यावर अजून अजित पवार गटाची कोणतेही प्रतिक्रिया आलेली नाही. 


मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते जरांगेंनी ज्यूस पिऊन उपोषण सोडलं...


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या संपूर्ण मागण्या मान्य झाल्या असल्याने, त्यांनी आमरण उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे. यावेळी अनेक मंत्री उपस्थित होते. 


'या' तीनही मागण्या मान्य...


54 लाख नोंदी सापडलेल्या कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे हि पहिली मागणी होती. तर, कुणबी प्रमाणपत्र नोंद सापडणाऱ्या कुटुंबाला सरसकट आरक्षण द्यावं अशी दुसरी मागणी होती. तसेच तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्यावं अशा तीन मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या होत्या. या तीनही महत्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: राजपत्र घेऊन नवी मुंबईत मनोज जरांगे यांची भेट घेतली. सर्व मागण्या मान्य करुन, मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना गुलाल लावला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! मनोज जरांगेंनी 'मराठा आरक्षणा'ची लढाई जिंकली; रात्री नेमकं काय घडलं?