अमरावती : माजी जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना घोटाळ्याप्रकरणी आता दुसऱ्यांदा मोठा दिलासा मिळाला आहे. नागपूर पाठोपाठ अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही अजित पवारांना आज क्लिन चिट देण्यात आली आहे. या घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलली आहे.
अमरावतीच्या पोलीस अधिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यात कायदेशीर बाबी तपासण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची होती आमि त्यांनी पूर्तता केली नाही. त्यामुळे या प्रकरणात अधिकाऱ्यांना किंवा अजित पवारांना जबाबदार धरता येणार नाही, असं नमूद करण्यात आलं आहे. असं प्रतिज्ञापत्र अमरावती एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलं आहे.
अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या विदर्भातीवल सिंचन घोटाळ्याप्रकरणी विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळातर्फे नऊ प्रकरणांची चौकशी बंद करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत. या घोटाळ्यासंबंधी तक्रारींमध्ये सुमारे 3000 निविदांचा तपास सुरु आहे आणि बंद झालेल्या कुठल्याही खटल्याचा अजित पवारांसी संबंध नाही असं महाराष्ट्र अॅंटी-करप्शन ब्युरोचे डीजी परमवीर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.
Irrigation Scam | सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लीनचिट? काय आहे सत्य? | ABP Majha