Ajit Pawar on Nilesh Lanke : मागच्या काळात निलेश लंकेला मीच राष्ट्रवादीत घेतलं होतं. पण माणसं महत्वाच्या पदावर गेल्यावर बदलतात, तसा निलेश बदलला, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर जोरदार टीका केली. त्याच्या आजूबाजूच्या चांडाळ चौकटीने पारनेरचे  वाटोळे केल्याचेही अजित पवार म्हणाले. त्याने (निलेश लंके) खासदारकी त्याच्याच घरात  घेतली आहे, आता आमदारकी त्याच्याच घरात घ्यायची तयारी त्याने सुरू केल्याचे अजित पवार म्हणाले. मी तुम्हाला समजावून सांगायला आलोय की तुम्ही एकी ठेवा. जागा एकालाच मिळणार आहे, अनेकजण इच्छुक आहेत असं अजित पवार म्हणाले. 


कुणाच्या नावाने घोषणा दिल्या तर त्याला तिकीट मिळणार नाही


अहिल्यानगरमधील पारनेरमध्ये आयोजीत केलेल्या सभेत अजित पवार बोलत होते. महायुती म्हणून 288 उमेदवार उभे करणार आहोत. समोरचे त्यांचा त्यांचा भाग म्हणून काम करतील. वसंत झावरे , निलेश लंके, विजय औटी यांनी यापूर्वी या तालुक्याचे प्रतिनिधित्व केले आहे. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने काम करतो असे अजित पवार म्हणाले. कुणाच्या नावाने घोषणा दिल्या तर त्याला तिकीट मिळणार नाही, घोषणा देणाऱ्यांना अजित पवारांनी चांगलेच खडसावल्याचे पाहायला मिळाले. 


पुरुषांच्या बरोबरीने महिलांना संधी दिली नाही तर तो देश मागे पडतो


पुरुषांच्या बरोबरीने महिलांना संधी दिली नाही तर तो देश मागे पडतो, त्यामुळं अर्थसंकल्प सादर करताना मी महिलांचा विचार केल्याचे अजित पवार म्हणाले. म्हणून आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणायच ठरवल्याचे अजित पावर म्हणाले. विरोधकांनी त्यावरही टीका केली. विरोधक वाटेल ते बोलत असल्याचे अजित पवार म्हणाले. पारनेर तालुका दुष्काळी भाग आहे, पण सुप्यात MIDC आली बदल झाला...
पण पारनेरच्या सुपा MIDC त गुंडगिरी असल्याचे अजित पवार म्हणाले.


पारनेर तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी द्या, सभेत झळकले बॅनर 


पारनेर तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी द्या असं म्हणत अजित पवारांच्या सभेत बॅनर झळकल्याचे पाहायला मिळाले. भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संतोष वाडेकर आणि कार्यकर्त्यांनी हे बॅनर झळकवल्याचे पाहायला मिळालं. अजित पवारांच्या उपस्थितीत पारनेरच्या बाजार तळ येथे कार्यकर्ता मेळाव्यात हा प्रकार घडला. अजित पवारांनी अनेकवेळा आश्वासन देऊनही दुष्काळी भागाला पाणी न मिळल्याने शेतकरी पुत्रांनी लक्ष वेधले.


महत्वाच्या बातम्या:


MP Nilesh Lanke on Sujay Vikhe Patil : मांजराने वाघाचं झुल घातलं म्हणजे वाघ होतं नसतो, ते जनतेनं ठरवायचं असतं; खासदार निलेश लंकेचा सुजय विखेंवर हल्लाबोल