निवडणुकीत नागराज मंजुळेंसारखं दिग्दर्शन कराः अजित पवार
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2016 11:04 AM (IST)
करमाळा (सोलापूर) : नागराज मंजुळेंनी 'सैराट'चं जसं यशस्वी दिग्दर्शन केलं, तसंच यशस्वी दिग्दर्शन आगामी निवडणुकीत करा, असा सल्ला राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. नगरपालिका निवडणुकांच्या घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराची सुरुवात करमाळ्यातून केली. यावेळी झालेल्या भाषणात अजित पवारांनी 'सैराट'चं आणि नागराज मंजुळेंचं कौतुक केलं.