नवी दिल्लीः सप्टेंबर महिन्याने गेल्या 136 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद केली आहे. या वर्षात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक उष्णता असल्याचं 'नासा'ने एका अहवालात म्हटलं आहे.
नासाच्या गोडार्ड इन्स्टिट्यूट फॉर स्पेस स्टडीज या संस्थेच्या संशोधकांनी जागतिक तापमानाचं विश्लेषण करताना ही माहिती दिली आहे.
साल 1951 ते 1980 दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या सरासरी तापमानाच्या तुलनेत या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये 0.91 डिग्री एवढं अधिक तापमान होतं. यापूर्वी 'नासा'कडून जून 2016 आतापर्यंतचा सर्वाधिक तापमानाचा महिना असल्याचं सांगण्यात आलं होतं.
'नासा'च्या आकड्यांनुसार 1998 ते 2015 दरम्यान तिसऱ्यांदा जून महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.