Raj Thackeray Aurangabad Rally Sabha Live : मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. त्यातच राज ठाकरेंच्या उद्या औरंगाबादेत होणाऱ्या बहुचर्चित सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे हे आज औरंगाबादमध्ये पोहोचणार आहेत. दरम्यान ते पोहोचण्याआधी त्यांना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी इफ्तार पार्टीचे आमंत्रण दिले आहे.
जलिल यांनी म्हटलं की, मी पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी इथे आलो होतो आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना हे देखील सांगितले आहे की, आपल्या शहरात शांतात आणि सुव्यवस्था राहावी यासाठी आमची कशाप्रकारे तुम्हाला मदत अपेक्षित आहे ते तुम्ही सांगावं. राज ठाकरे यांची इथे सभा होणार आहे, मी त्यांना एवढच सांगू इच्छितो की 1 तारखेला तुमची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. साडे सात वाजता तुमची सभा आहे, त्या सभेपूर्वी हिंदू-मुस्लीम एकतेसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन इफ्तार करु, यामधून एक चांगला संदेश जाईल, असं जलिल यांनी म्हटलं आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं की, 99 टक्के लोक शांतता प्रेमी आहेत, केवळ एक टक्का लोक अडथळे निर्माण करतात. माझा विश्वास आहे की पोलीस अशा 1 टक्के लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम आहे. मग ते कोणत्या पक्षाचे, समुदायाचे आहेत त्याने काही फरक पडणार नाही. जे राजकारण करण्यासाठी आले आहेत त्यांना राजकारण करावं, जे प्रार्थना करू इच्छितात त्यांना प्रार्थना करू द्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांच्या सभेचं काऊंटडाऊन सुरु
राज ठाकरे यांच्या सभेचं काऊंटडाऊन सुरु झालंय. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. औरंगाबादच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सभा गाजवल्या होत्या. याच मैदानावरुन बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. आता त्याच मैदानावर राज ठाकरे यांची उद्या सभा होतेय. राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यातील सभेत मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शवलाय. तसंच ते भोंगे उतरवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे आता राज ठाकरे उद्या कोणती गर्जना करणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. ठाकरी तोफ कुणावर धडाडणार याची उत्सुकता लागलीय.
इतर संबंधित बातम्या
Raj Thackeray: पुरोहितांचे आशीर्वाद घेउन राज ठाकरे रवाना, अमित ठाकरेंकडून देवीचं दर्शन ABP Majha