अहमदनगर : क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राज्यातील सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचं लवकरच विभाजन होण्याची शक्यता आहे. जनतेची मागणी राज्य सरकार लवकरच पूर्ण करणार असल्याचा दावा नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केला.
अहमदनगरचं विभाजन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. प्रशासकीयदृष्ट्या एवढ्या मोठ्या जिल्ह्याचा कारभार हाकणंही अवघड होत असल्यामुळे लवकरच नगरचं विभाजन करण्याचे सूतोवाच राम शिंदेनी केले.
कोपरगावजवळच्या कोकमठाणमध्ये बोलताना राम शिंदेंनी याबाबत सूतोवाच केलं. प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने अहमदनगरचे दक्षिण आणि उत्तर असं द्विभाजन होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर केलेला हेरगिरीचा आरोपही यावेळी राम शिंदेंनी खोडून काढला.