सत्ताधारी आणि विरोधकांनी घोषणाबाजी करत निषेधाचे फलक फडकावले. यावेळी संचालक मंडळानं सभासदांचा बाप का काढला, त्यांनी अगोदर माफी मागावी तरच सभा सुरु होईल, असं म्हणत जोरदार वादंग सुरु केला.
माफी मागितल्याशिवाय सभा सुरु होऊ न देण्याचं सांगत आधी पाच प्रश्न झाले पाहिजेत, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. हुकूमशाही चालणार नाही, गोंधळ सुरुच राहणार असं सांगून विरोधकांनी व्यासपीठाचा ताबा मिळवला. त्यानंतर मास्तरांनी एकमेकांना व्यासपीठावरच धक्काबुक्की केली.
इतकंच नाही, तर खाली पाडून तुडवलं, एकमेकांवर लोड भिरकावत गोंधळही घातला. मास्तरांना आवरण्यासाठी पोलिसांना व्यासपीठावर बोलवण्यात आलं. तेव्हा पोलिसांनी मास्तरांना ढकलत सभागृहाबाहेर हाकललं.
गोंधळी मास्तरांची गचांडी धरुन पोलिसांनी त्यांना चोप दिला. चार मास्तरांना ताब्यात घेतलं. आहे. पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी व्यासपीठाचा ताबा घेत शिक्षकपदाची लाज राखण्याचं आवाहन केलं.
पाहा व्हिडिओ :