Ahmednagar Kopargaon Politics: अहमदनगरमधील कोपरगामध्ये (Kopargaon News) सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. आमच्या नादाला लागलात तर ठोकून काढू, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी दिला आहे. 2 दिवसांपूर्वी झालेल्या कोपरगाव शहरातील भाजप राष्ट्रवादी राड्यावरून राष्ट्रवादी आमदार महोदयांनी हा भाजपला इशारा दिला आहे.
दहीहंडी कमान उभारण्यावरून 2 दिवसापूर्वी कोपरगाव शहरात मध्यरात्री भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर काल दोन्ही पक्षाचे दहीहंडी कार्यक्रम देखील त्याच जागेवर शेजारी शेजारी संपन्न देखील झाले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रवादीचे आमदार तथा साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. आमच्या नादाला लागलात तर ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. काही लोकाना वाटतंय सरकार बदललं आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढलाय. मात्र आमदार बदललेला नाही, आमदार मीच आहे असा टोला आशुतोष काळे यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे.
दहीहंडी उत्सवाची स्वागत कमान उभारण्यावरून गोंधळ
कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहीहंडी उत्सवाची स्वागत कमान उभारण्यावरून 2 दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला होता. यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गटांनी आमने सामने येत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करण्याची वेळ आली होती. या धावपळीत कोपरगाव पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे पडल्याने त्याच्या हाताला किरकोळ दुखापत सुद्धा झाली होती.
आता आशुतोष काळे यांच्या या इशाऱ्यानंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया येतेय याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान या राजकीय संघर्षामुळं कोपरगावात काहीसं तणावाचं वातावरण आहे.
कोण आहेत आमदार आशुतोष काळे
आमदार आशुतोष काळे (mla ashutosh kale) राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे आहेत.
जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात त्यांनी नवी ओळख निर्माण झालीय.
ते रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष आहेत.
सोबतच त्यांच्याकडे साईसंस्थानचे अध्यक्षपद आहे
इतर महत्वाच्या बातम्या