Nagar Daund Highway Accident : अहमदनगर- दौंड रस्त्यावर (Ahmednagar Daund Highway Accident) एका भीषण अपघातात बहिण आणि भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी घडली. महिंद्रा पिकअप आणि स्कूटीच्या अपघातात सख्या भावा-बहिणीचा मृत्यू झाला आहे. काष्टी दौंड रस्त्यावर मोटार सायकलला पिकअपने धडक दिल्याने अनुष्का गणेश शिंदे (14) आणि आदित्य गणेश शिंदे (12) हे भाऊ बहिण जागीच ठार झाले. 


ही घटना काल सकाळी 8 च्या दरम्यान घडली. अनुष्का आणि आदित्य हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खुलू या गावचे रहिवासी होते. अनुष्का आणि आदित्य हे सकाळी स्कुटीवरून काष्टी कडून दौंडच्या दिशेने शाळेत निघाले होते. अनुष्का स्कुटी चालवत होती. परंतु समोरून भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने धडक दिली त्यातच दोघांचा मृत्यू झाला. 


ही घटना दौंड तालुक्यातील सोनवडी येथील धनश्री हॉटेल जवळ घडली. धडक दिल्यानंतर गाडी चालक पळून गेला. या अपघातात भावा बहिणीचा मृत्यू झाला आहे तर स्कुटीचे नुकसान झालं आहे.


ज्या पिकअपने धडक दिली ती गाडी पासिंग झालेली नव्हती. अनुष्का आणि आदित्यचे चुलते  सतिश शिंदे यांनी अज्ञात वाहन धारकाविरोधात दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सतीश शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्त्वाच्या इतर बातम्या :