अहमदनगर : अहमदनगर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बडतर्फ केलेल्या 18 नगरसेवकांवरची कारवाई मागे घेण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली.


अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये पक्षादेश डावलून भाजपाला मतदान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले होते. तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनाही पदावरुन काढण्यात आलं होतं. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली होती.

अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षाने कॉंग्रेस पक्षाला मतदान करण्याचा आदेश असताना तो डावलण्यात आला. त्यानंतर पक्षाच्यावतीने त्यांना सात दिवसांमध्ये आपले म्हणणे मांडण्याची संधी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी नोटिशीद्वारे दिली होती

परंतु यावर कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याने पक्षाच्यावतीने कारवाई करण्यात आली होती. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात या सर्व नगरसेवकांवरची कारवाई मागे घेण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या या 18 नगरसेवकांवरची कारवाई मागे

1) सागर बोरुडे
2) मीनाक्षी चव्हाण
3) दीपाली बारस्कर
4) संपत बारस्कार
5) विनीत पाउलबुद्धे
6) सुनील त्रंबके
7) खान समद वहाब
8) ज्याती गाडे
9) शोभा बोरकर
10) कुमार वाकळे
11) रुपाली पारगे
12) अविनाश घुले
13) गणेश भोसले
14) परवीन कुरेशी
15) शेख नजीर अहमद
16) प्रकाश भागानगरे
17) शीतल जगताप
18) मीना चोपडा

संबंधित बातम्या

अहमदनगरमध्ये सर्वाधिक जागा मिळवूनही शिवसेनेचा गेम कसा झाला?


अहमदनगर महापौर निवडणूक : बसपच्या 4 नगरसेवकांचं निलंबन


नगरसेवकाच्या कृत्याने राष्ट्रवादीला लाज | स्पेशल रिपोर्ट | अहमदनगर/मुंबई | एबीपी माझा


भाजपला पाठिंबा का दिला हे पक्षापुढे मांडणार : संग्राम जगताप | अहमदनगर | एबीपी माझा


महापालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी युती- संग्राम जगताप | अहमदनगर | एबीपी माझा


राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं नगर महापालिका भाजपकडे | अहमदनगर | एबीपी माझा


भाजपला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई : जयंत पाटील | अहमदनगर | एबीपी माझा


अहमदनगर महापालिकेत अखेर भाजपचाच महापौर | एबीपी माझा