Manikrao Kokate : पीक विमा योजना बंद करणार आहे हे कोणी सांगितलं असं वक्तव्य वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं. त्यामध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचे ते म्हणाले. विरोधकांनी आमच्या गैरप्रकाराचा अर्थ भ्रष्टाचार झाल्याचा काढला आहे. गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार आहे का? असा सवाल देखील कोकाटे यांनी उपस्थित केला. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या घरी कोकाटे यांनी भेट दिली, यावेळी ते बोलत होते.
अजितदादा आणि शरद पवार एकत्र येतील का?
गैरप्रकार जर कोणी जर करत असेल तर त्यामध्ये अपडेशन करणं जरुरी आहे. विरोधकांनी आमच्या गैरप्रकाराचा अर्थ भ्रष्टाचार झाल्याचा काढला. मात्र तुम्हीही त्यांना विचारलं की भ्रष्टाचाराविषयी तुमचे मत काय? मग त्यांना तर चांगलं आहे घरबसल्या बडवायला मिळतं असे कोकाटे म्हणाले. अजितदादा आणि शरद पवार हे एकत्र येतील की नाही हे मला सांगता येणार नाही. वरिष्ठ पातळीवर त्यांची काय चर्चा झालेली आहे त्याबाबत मी अनभिज्ञ असल्याचे कोकाटे म्हणाले.
पालकमंत्रीपदाबाबतचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांना
नाशिक पालकमंत्रीपदासंदर्भात देखील कोकाटे यांना विचारण्यात आले. त्या संदर्भात मला काही सांगता येणार नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा तो विषय आहे. माझा विषय नाही, त्यामुळं कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचा? हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळं त्याच्यावर कुठल्याही मंत्र्यांनी भाष्य करु नये असे कोकोटे म्हणाले.
कोणी नाराज आहे असं मला अजिबात वाटत नाही. पालकमंत्रीच काय तर तुम्हाला मंत्रीपद मिळालेला आहे. तुम्ही राज्यात काम करा ना. पालकमंत्र्यावरच काय येऊन अडकलं. मला देखील नंदुरबार जिल्हा आहे, त्यामुळं मी काही नाराज आहे का? असेही कोकाटे म्हणाले.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांना वाटलं तर ते नक्कीच बदल करतील असे कोकाटे म्हणाले.
पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही यासाठी उपाययोजना करणार
मी म्हटलं की फक्त दोन-चार टक्के गैरप्रकार होतात, पण गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आम्ही आता उपाययोजना करतोय. युनिक फार्मर आयडी ला आधार कार्डसोबत कनेक्ट करत आहोत असे कोकाटे म्हणाले. मात्र, जे मी म्हटलो नाही तेच तुम्ही लावून धरत आहात असंही ते म्हणाले. तुम्ही माझं भाषण बघा आणि बाईट बघा त्यामध्ये फक्त गैरप्रकार हा शब्द वापरलेला आहे. गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार नाही असं स्पष्टीकरण कोकाटे यांनी यावेळी दिल.
आम्हाला कोणत्याही भ्रष्टाचाराला पाठीशी घालायचे नाही हा आमचा स्पष्ट मुद्दा आहे.