खेड- शिवापूर टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन, कोल्हापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत उद्या बदल
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 15 Feb 2020 08:35 PM (IST)
खेड- शिवापूर येथे असलेला टोलनाका बंद करण्यात यावा यासाठी रविवारी (16 फेब्रुवारी) आंदोलन करण्यात येणार आहे.याकरीता कोल्हापूरकडून पुण्याकडे जाणारी वाहने उद्या (16 फेब्रुवारी) सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत खालील मार्गाने वळविण्यात आली आहेत.
पुणे : पुणे- सातारा महामार्गावर खेड- शिवापूर येथे असलेला टोलनाका बंद करण्यात यावा यासाठी रविवारी (16 फेब्रुवारी) आंदोलन करण्यात येणार आहे. टोलनाका हटवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला कृती समितीला सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला असून हे नेते देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. खेड-शिवापूर येथील टोलनाका पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून हटवून तो सातारा जिल्ह्याच्या हद्दीत सुरू करण्यात यावा अशी या कृती समितीची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी एनएचएआय चे अधिकारी, रिलायन्स इन्फ्रा ही रस्त्याच काम करणाऱ्या कंपनीचे अधिकारी आणि टोल वसुलीच काम करणाऱ्या कंपनीचे अधिकारी यांची मागील आठवड्यात बैठक घेतली होती. या बैठकीत स्थानिक लोकांच्या वाहनांना टोलमधून पंचवीस टक्के सुट देण्याची सूचना केली होती . त्यासाठी स्थानिकांना ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. मात्र टोलनाका हटवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कृती समितीला हा प्रस्ताव मान्य नाही. त्यामुळे आंदोलन करण्यावर ही कृती समिती ठाम आहे. पुणे- सातारा दरम्यान असलेल्या या महामार्गाच्या विस्ताराचे काम मागील सात वर्षांपासून रखडलं असून टोल मात्र सातत्याने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. आंदोलनामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर वाहतुकीचा प्रश्न अथवा कोंडी निर्माण होवू नये याकरीता कोल्हापूरकडून पुण्याकडे जाणारी वाहने उद्या (16 फेब्रुवारी) सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत खालील मार्गाने वळविण्यात आली आहेत. पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल सातारा वाढे फाटा-वाठार स्टेशन-फलटण-लोणंद मार्गे पुणे, जोशी विहिर वाठार मार्गे लोणंद-निरा-जेजुरी मार्गे पुणे, खंडाळा-लोणंद मार्गे पुणे, शिरवळ-लोणंद मार्गे-निरा-जेजुरी मार्गे पुणे, वाई-शहाबाग फाटा-ओझर्डे मार्गे जोशीविहिर मार्गे वाठार, वाई-एमआयडीसी फाटा मार्गे शहाबाग फाटा- ओझर्डे मार्गे जोशीविहिर मार्गे वाठार, अवजड वाहने वाढे फाटा मार्गे वाठार-लोणंद मार्गे पुण्याकडे जातील. Electric Bus | मुंबई ते पुणे धावणार देशातील पहिली इलेक्ट्रिक बस, नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन संबंधित बातम्या :