कोल्हापूर: कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पातंर्गत कोल्हापूर पोलीस उद्यानामध्ये 303 फूट उंचीच्या ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे.
वाघा बॉर्डरनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या 303 फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर आज सकाळी 5 वाजून 48 मिनिटांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तिरंगा डौलाने फडकला.
हा क्षण डोळयात साठवतांना प्रत्येकजण आकाशात डौलाने फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाकडे अभिमानाने पाहात होता.
यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधिक्षक महादेव तांबडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, केएसबीपीचे सुजय पित्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, या ध्वजस्तंभावर 90 फूट लांब आणि 60 फूट रुंद अशा 5 हजार 400 चौरस फुटाचा राष्ट्रध्वज फडकाविण्यात आला.