लातूर : गाडीने एका व्यक्तीला धडक देऊन जवळपास 22 किमी फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील निवडा फाटा येथे ही घटना घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
ही घटना गुरुवारी (21 फेब्रुवारी) पहाटे घडली आहे. धडकेनंतर मारहाणीच्या भीतीने चालकाने पळ काढल्याचे सांगितले जात आहे. व्यक्ती गाडीखाली अडकलेला असताना चालकाने गाडी न थांबवता सुरुच ठेवली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, आश्रुबा मोरे असं या घटनेतील मृत व्यक्तीचं नाव असून ते पोहरेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
धडक दिलेली गाडी अंबाजोगाई येथून लातूरकडे येत होती, त्यावेळी ही घटना घडली. पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आहे, मात्र चालक फरार झाला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
थरारक व्हिडीओ