Jayant Patil: राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांची आज तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ईडी कार्यालयातून (ED office) बाहेर आल्यानंतर जयंत पाटील हे जवळच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. आपण ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिली असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
जयंत पाटील यांच्यावर आयएल अँड एफएस कंपनीशी संबंधित गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील काही वर्षांपूर्वी नोटीस देण्यात आली होती. या प्रकरणी दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेने पहिल्यांदा गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर गुन्ह्यातील आर्थिक व्याप्ती पाहता ईडीने हे प्रकरण आपल्याकडे घेतले होते.
जयंत पाटील यांच्यावर आरोप काय?
- 2008 ते 2014 या कालावधीत रस्ते उभारणीच कॉन्ट्रॅक्ट संबंधित कंपनीला देण्यात आलं होतं.
- संबंधित कंपनीकडून सब कॉन्ट्रॅक्टरला कंत्राट देण्यात आलं. सब कॉन्ट्रॅक्टरने कथितरित्या जयंत पाटील यांच्याशी निगडित कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे.
- ज्यावेळी हे पैसे देण्यात आले त्यावेळीं जयंत पाटील राज्याचे गृहमंत्री होते.
आयएल अँड एफएस कंपनी काय काम करते?
- IL&FS कंपनीवर 91 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत असल्यामुळे त्यांच्याकडे पैसा नाही.
- सरकारकडून मिळणारे 17 हजार कोटी अडकले आहेत. कंपनीचे एकूण 250 पेक्षा अधिक सब्सिडिरीज आणि जाँईंट व्हेंचर्स आहेत.
- जमिनीच्या वादात जास्त नुकसानभरपाई दिल्यामुळे प्रकल्पांचा खर्च वाढला. अनेक महत्त्वाचे म्युचअल फंडस् आणि पेन्शन योजना टांगणीवर लागल्या आहेत.
- विजय मल्ल्याच्या किंगफिशर कंपनीची परिस्थिती बिकट झाली होती. त्यांची जितकं विमानं हवेत होती, त्यापेक्षा कितीतरी जास्त विमानं इंधनं न भरल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे पडून होती. असं असूनसुद्धा या परिस्थितीचं गांभीर्य जाणवलं नाही किंवा जाणवू दिलं नाही.
- जेव्हा कर्जाचे हप्ते फेडण्यास माल्या यांनी असमर्थता दर्शवली आणि किंगफिशर कंपनी बंद केली तेव्हा हे सगळं समोर आलं.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची निदर्शने
ईडीने बजावलेल्या दुसऱ्या समन्सनंतर अखेर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडी चौकशीला सामोरे गेले. परंतु ते जाण्यापूर्वी मोठया प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी ईडी कार्यालय आणि राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर दिसून आली होती.ईडी चौकशीविरोधात मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर तसेच इतर जिल्ह्यातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. बरेच पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईला येऊ नये असं आवाहन जयंत पाटील यांनी चौकशीला जाण्यापूर्वी केले होते.