मुंबई : दिवाळीनंतर मुंबईत पुन्हा मराठा मोर्चाचं वादळ धडकणार असल्याची घोषणा आज मराठा क्रांती मोर्चाच्या कोअर कमिटीने केली आहे. दिवाळीनंतर राज्यातील गावागावातून‘मराठा संवाद यात्रा’ निघणार आहे.

‘मराठा संवाद यात्रा’16 ते 26 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी राज्यभरातल्या ‘मराठा संवाद यात्रा’ मुंबईत सुरु असणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे. म्हणून येणाऱ्या काळात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुण वाद पेटण्याची शक्यता आहे.

मराठा अथवा मराठा क्रांती मोर्चा नावानं राजकीय पक्ष स्थापन करणाऱ्यांना समाज धडा शिकवणार आहे, मराठा क्रांती मोर्चा नावाचा कोणताही पक्ष स्थापन करून देणार नाही. सरकार ‘फोडा व झोडा’ नितीचं राजकारण करत आहे. मराठा समाज या राजकारणाला बळी पडणार नाही. असं मत मराठा कोअर कमिटीने व्यक्त केलं.