Adv. Yashomati Thakur : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (k chandrasekhar rao) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईमध्ये भेट घेतली. यावेळी बोलताना केसीआर म्हणाले की, ‘ही तर फक्त सुरुवात आहे. आम्ही देशातील इतर नेत्यांशीही चर्चा करणार आहोत.’ मुंबईतून के. चंद्रशेखर राव यांनी देशात भाजपविरुद्ध तिसऱ्या आघाडीची मोर्चे बांधणी करणार असल्याचे थेट संकेत दिले आहेत. केसीआर आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर या तिसऱ्या आघाडीची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे, असं म्हणता येईल. पण भाजपविरोधी सुरु असलेल्या तिसऱ्या आघाडीवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त करत टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई यशस्वी होणार नाही, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.


यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेवर टीकास्त्र सोडलं आहे. यशोमती ठाकूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘काँग्रेसला वगळून मोदींविरोधातली लढाई यशस्वी होणार नाही. काँग्रेसने अतिशय प्रामाणिकपणे 'संघी' अजेंड्याविरोधात लढाई लढली आहे. आज देशात बदलाचे जे वारे वाहतायत, विरोधी पक्षांच्या आवाजाला जी बळकटी मिळतेय ती काँग्रेसमुळेच आहे.’ काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसशिवाय मोदींचा पराभव करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. 






मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आणि केसीआर यांनी रविवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले. केसीआर म्हणाले की, ही तर फक्त सुरुवात आहे. आम्ही देशातील इतर नेत्यांशीही चर्चा करणार आहोत, असं म्हणत केसीआर यांनी देशात भाजपविरुद्ध तिसऱ्या आघाडीची मोर्चे बांधणी करणार असल्याचे थेट संकेत दिले आहेत. केसीआर आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर या तिसऱ्या आघाडीची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे, असं म्हणता येईल.  


भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर - केसीआर  
भाजपवर हल्लाबोल करत केसीआर म्हणाले आहेत की, ''भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो. केंद्र सरकारने आपलं धोरण बदलायला हवं. असं न केल्यास पुढे जाऊन त्यांना हे सर्व भोगावे लागणार आहे.''


आमच्या भेटीत लपवाछपवीसारखं काहीही नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही भेटणार अशी चर्चा होती. तो दिवस आज उजडला. शिवाजी महाराजांच्या जयंतीनंतर दुसऱ्या दिवशी भेट झाली आहे. हे आमच्यासाठी सौभाग्य आहे. आमच्यातील सदिच्छ भेट होती, त्यात काही लपवण्यासारखे नाही. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, देशात सुडाचे राजकारण सुरु झाले आहे. आमचे राजकारण तसे नाही. या गोष्टी अशाच सुरु झाल्या तर देशाचं भवितव्य काय? सूडाचं राजकारण करणे ही आमची परंपरा नाही. सूडाचे राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही. देशात परिवर्तन होण्याची गरज आहे. परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचे एकमत झाले आहे. देशातील राजकारण विकासकामांवर चर्चा झाली.  संपूर्ण देशात राज्य एकमेंकाचा शेजारधर्म विसारले आहेत. पण राज्याराज्यात चांगले वातावरण राहिले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.