सांगली : सांगलीतील बहुचर्चित अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी अनिकेतच्या कुटुंबीयांना माहिती दिली.


दरम्यान, अनिकेतच्या हत्या प्रकरणी आणखी एका पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष कांबळे यांचं निलंबन करण्यात आलं. अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या कामात हलगर्जी केल्याप्रकरणी कांबळेंना निलंबित करण्यात आलं.

थर्ड डिग्रीत अनिकेतचा मृत्यू

पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, पोलिसांकडून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून, दोन आरोपींनी पलायन केल्याचा बनाव रचण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक युवराज कामटेसह 5 पोलिसांना अटक करण्यात आली. तसंच या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता.

याप्रकरणात 12 आरोपी पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

अनिकेत कोथळेच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न

अनिकेत कोथळे हत्याप्रकरण : पोलीस अधीक्षक शिंदेंची अखेर बदली


अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलीस निलंबित


अश्लील चित्रिकरणाचा पर्दाफाश केल्याने अनिकेतची हत्या?

मालकाशी वादाचा अनिकेत कोथळेच्या हत्येशी संबंध?

सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू