मुंबई : कोरोनाची देशातील परिस्थिती पाहता व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष अशा सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी युवासेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता आपण स्वतः यामध्ये लक्ष घालून देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा. अव्यवसायिक अभ्यासक्रमाचे बरेचसे मूल्यमापन पूर्ण झाले असून अंतिम परीक्षांचे मूल्यमामापनातील महत्त्व 10 टक्क्यांहून जास्त असणार नाही. त्यामुळे विद्यापीठांनी ठरविलेल्या गुणपद्धतीप्रमाणे त्यांचा निकाल लावला जाऊ शकतो.
जगात ज्या देशांनी शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या देशात कोरोनाबाधितांची संख्या अधिक वाढली आहे. दरम्यान शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून ते मे करण्याऐवजी जानेवारी ते डिसेंबर अशी रचना आपण करू शकतो हे देखील त्यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
JEE NEET Exam | जेईई, नीटची परीक्षा पुढे ढकलण्याची पुन्हा मागणी, शिक्षण विभाग, कोर्टाचा नकार