Aditya Thackeray Met Sharad Pawar : महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्यावरुन ठिणगी पडल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात काही ठिकाणच्या जागांवर तिढा असल्याची माहिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. यावेळी माजी मंत्री अनिल परब देखील उपस्थित होते. मुंबईतील वाय बी सेंटरमध्ये त्यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर शरद पवारांनी काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी पोनवरुन चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
आदित्य ठाकरेंनी पवारांची भेट घेतल्यानंतर माजी मंत्री नसीम खान हे देखील पवारांच्या भेटीला
महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा असल्यानं काँग्रेस-पवार गटाचे वरिष्ठ नेते एकमेकांच्या संपर्कात आहे. पेच सोडवण्यासाठी शरद पवारांची पुन्हा वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी पवारांची भेट घेतल्यानंतर माजी मंत्री नसीम खान हे देखील वाय बी चव्हाण सेंटरला पावारंच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. शरद पवारांच्या हायकमांडसोबत झालेल्या चर्चेनंतर नसीम खान हे पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. दरम्या, शिवसेनेचे नेते अनिल देसाई हे देखील पवारांच्या भेटीला वाय बी चव्हाण सेंटरला दाखल झाले आहेत.
महाविकास आघाडीत कुठलाही वाद नाही : संजय राऊत
महाविकास आघाडीत कुठलाही वाद नाही. 15 तास बसू पण तोडगा काढू असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. सकाळी उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाली आता पवार साहेब यांना भेटायला आलो असल्याचे राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत सर्व काही सुरळीत सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचती माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.
विदर्भातील एकूण 12 जागांवर तिढा
विदर्भातील एकूण 12 जागांवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. या 12 जागांवर महाविकास आघाडीचा आमदार नाही. मविआचा आमदार नसलेल्याच 12 जागा आम्ही मागितल्या आहेत, असे ठाकरेंच्या शिवसेनेचे मत आहे. तर काँग्रेस हा पक्ष शिवसेनेला 12 जागा देण्याच्या मन:स्थितीत नाही. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस शिवसेनेला 8 जागा देण्यासाठी तयार आहे.
महत्वाच्या बातम्या: