या कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे ज्या गाडीत आल्या होत्या. त्या गाडीसह ताफ्यातील सर्व गाड्यांवर वाहुतकीला अडथळा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. डफरीन चौक हा रहदारीचा भाग आहे. मात्र रस्त्यालगत असलेल्या सभागृहामुळे रस्त्यावर ताफा उभा करण्यात आला होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. हा सर्व प्रकार वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ताफा रस्त्यावरून हलवण्याच्या सूचना केल्या.
मात्र त्यानंतरही ताफा न हलल्याने ताफ्यातील सर्व 8 गाड्यांवर पोलिसांनी कारवाई केली. मोटर वाहन कायद्यातील कलम 122, 177 नुसार ही कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने नोंदणी असलेल्या गाडीचाही समावेश आहे. रस्त्यावर होत असलेल्या अडथळ्यामुळे गाड्यांवर कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली तर पोलिसांना पूर्व परवानगी दिली होती. तसेच हॉलच्या जवळ कुठेही पार्किंगची व्यवस्था नव्हती. परवानगी असताना ही जाणिवपूर्वक कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.