औरंगाबाद-जालना रोडवर भीषण अपघात, जवानासह चिमुकलीचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 01 Dec 2017 08:02 PM (IST)
औरंगाबाद-जालना रोडवरील केंब्रिज चौकात आज टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एसआरपी जवानासह एक चिमुकलीचा मृत्यू झाला.
औरंगाबाद : औरंगाबाद-जालना रोडवरील केंब्रिज चौकात आज टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एसआरपी जवानासह एक चिमुकलीचा मृत्यू झाला. या अपघातात एक महिलाही जखमी झाली आहे. किशोर थोटे असं मृत एसआरपी जवानाचं आणि गायत्री राजू दहिहंडे असं एक वर्षाच्या चिमुकलीचं नाव आहे. जवान किशोर थोटे हे जवळच असलेल्या आडगाव येथे आपल्या आजी सासूच्या अस्थी विसर्जनासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला. दरम्यान, या अपघाताप्रकरणी टँकर चालकाला अटक करण्यात आली आहे.