Samriddhi Highway Accident : दोन दिवसांपूर्वी बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) झालेल्या भीषण अपघातात (Accident) 26 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा एकदा समृद्धी महामर्गावर आज अपघाताची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील करमाडजवळ समृद्धी महामर्गावर सकाळी कारचा हा अपघात झाला आहे. तर या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले होते. ज्यात एकाच मृत्यू झाला आहे. सुशीलकुमार दिलीप थोरात (वय 38 वर्षे रा. शिरपूर जैन सरकारी दूध डेअरी मागे मालेगाव जि. वाशिम) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर बबिता सुशीलकुमार थोरात (वय 35 वर्षे) व अर्पिता सुशीलकुमार थोरात (8 वर्षे) असे जखमींचे नावं आहेत. 


अधिक माहिती अशी की, समृद्धी महामार्ग चॅनेल कुमार 400 येथे झालेल्या कार अपघातात प्रवास करणाऱ्या कुटुंबातील पती ठार तर पत्नी आणि 8 वर्षीय मुलगी जखमी झाली. आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास करमाड जवळील चॅनल क्रमांक 400 जवळ हा अपघात घडला. याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. सुशीलकुमार दिलीप थोरात असे अपघातात मृत्यू पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.


सुशील हे पत्नी बबिता व मुलगी अर्पितासह शिर्डीहून अकोल्याला चालले होते. सुशील अकोल्याला एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. ते शिर्डीला कुटुंबासह दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते पहाटे शिर्डीहून अकोल्याला निघाले. दरम्यान करमाडच्या गेट नंबर 400 जवळ त्यांचे कारवरून नियंत्रण सुटले. अन कार पलटी झाली. यात सुशील आणि पत्नी बबिता या गंभीर जखमी झाल्या होत्या. तर मुलीला किरकोळ मार लागला. या अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सुशील थोरात यांना तपासून मयत घोषित केले. तर पत्नी बबिता आणि मुलगी अर्पिता यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.


गुरुपौर्णिमेच्या दिवशीच 'गुरुजीं'चा अपघात....


बीडच्या जिल्ह्यातील शिरूरजवळ एका कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये दोन प्राध्यापकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शहादेव डोंगरे आणि अंकुश गव्हाणे अशी या प्राध्यापकांची नावं असल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही शिक्षक शिरूर येथील कालिकादेवी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू होते. तर आज सकाळी नेहमीप्रमाणे ते बीडवरून शिरूर येथे महाविद्यालयाकडे निघाले होते. तर मुर्शदपुर फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला एका कारणे पाठीमागून जोराची धडक दिली, आणि यामध्ये या दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी जळून खाक झाली आहे. ज्यात दोन्ही शिक्षकांचे मृतदेह होरपळून निघाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच, बुलढाणा दुर्घटनेनंतर आज भीषण कार अपघातात तिघांचा मृत्यू