Accident on Mumbai Ahmedabad National Highway : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय. या अपघातांमध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी आहेत. जखमीवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं म्हटले जातेय. त्यामुळे मृताची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बोईसर चिल्हार फाट्याजवळ अवाणढणी गावाजवळ रविवारी झालेल्या भीषण अपघातात दांडी येथील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य सहा जण जखमी झाले असून त्यांना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईकडून दांडी येथे परतताना प्रवासी वाहन ट्रकच्या मागच्या बाजूने धडक दिल्याने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मनोर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.


एकवीरा मातेचे दर्शन घेऊन हे कुटुंब पालघर तालुक्यातील बोईसर दांडी येथे परतत असताना हा अपघात घडला. वाहनांमध्ये एकूण बारा जण प्रवास करीत होते, त्यातील चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांची प्रकृती अति गंभीर आहे. तर सहा जण जखमी आहेत.  अपघातातील मृतामध्ये 1) हेमंत तरे (वय -60), 2) सुषमा आरेकर (वय -32), 3) चालक, राकेश तमोरे (वय-42), 4) सर्वज्ञा आरेकर (वय-02) या चौघांचा समावेश आहे. तर, तृप्ती तामोरे (वय 35), रमेश आरेकर (वय 54) हे यांची प्रकृती गंभीर आहे. याशिवाय, 1) हर्षद तरे (वय 27), 2) भव्या आरेकर (वय 4), 3) महेश आरेकर (वय 39), 4)सुनील तामोरे (वय 40) 5)आकाश पाटील (वय 25), 6) जयेश तामोरे वय (03) हे सहाजण जखमी झाले आहेत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



हेही वाचा :  आम्हाला तुझा अभिमान वाटतो; गांजे गावातल्या पहिल्या महिला फौजीचे जल्लोषात स्वागत