अपघातानंतर तासाभराने कारमध्ये अडकलेल्या मृतांना बाहेर काढण्यात आलं. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
खेडशिवापूर टोलनाक्याच्या अलिकडे अर्धा किमी अंतरावर एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या आयटेन या कारने उभ्या ट्रकला धडक दिली.
कारमध्ये चालक ओंकार पोळ, अरुणा भोसले, उज्ज्वला सणस, अश्विनी असवले या चौघांचा जागीच मृत्यू झाला.