धुळे: धुळे-सोलापूर महामार्गावरील विंचूर येथील एका पुलावरून दोन ट्रक खाली कोसळल्याची माहिती समजते आहे. पुलावर मोठ्या प्रमाणात खोल खड्डे आहेत त्यामुळेच हा अपघाता झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अपघातात दोन वाहानातील चार जण जखमी झाले आहेत. त्या चारही जणांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या अपघातानंतर बराच वेळ पोलीस घटनास्थळी उपस्थित नव्हते. या महामार्गावरील पुलावर खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक थेट खाली कोसळला. दोन्ही अपघात अशाच प्रकारे झाले असल्याची माहिती समजते आहे. दरम्यान या येथील खड्ड्यांमुळे महामार्गावरची वाहतूक अनेकदा ठप्पही होते.