1. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर मनसेची गुंडगिरी, ‘माझा कट्ट्या’वर संजय निरुपम यांचा आरोप https://goo.gl/k6zycL तर मनसेवरील आरोप बिनबुडाचे, बाळा नांदगावकरांचं स्पष्टीकरण https://goo.gl/wrDQjz



  1. न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करा, आम्हाला रस्त्यावर यावं लागणार नाही, फेरीवाला प्रश्नी राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला https://goo.gl/hP9se3



  1. भाजप सरकारच्या पाठिशी राष्ट्रवादीचे अदृश्य हात नाहीत, ‘माझा’ला दिलेल्या खास मुलाखतीत सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण, फडणवीस सरकारच्या जाहिरातबाजीवरुनही टीकास्त्र https://goo.gl/oBvvKy



  1. अजित पवार 2019 साली राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असण्याची शक्यता, धनंजय मुंडेंच्या अहमदनगरमधील दाव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या https://goo.gl/hA2t21



  1. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट, राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण https://goo.gl/xYHa1d



  1. ऊस दरासंदर्भातली शेतकरी संघटना आणि सरकारमधली बैठक फिस्कटली, टनामागे ऊसाला 3500 रुपयांचा दर देण्याची संघटनांची मागणी अमान्य https://goo.gl/dZdWcS



  1. कर्जमाफीच्या तणावामुळे एका अधिकाऱ्याचा मृत्यू तर दुसरा आयसीयूमध्ये, राजपत्रित संघटना चिंतेत, उद्या सहकार प्राधिकरणात बैठक https://goo.gl/cDvN4w



  1. मुंबईकरांना दिल्लीतील कामगारांपेक्षा कमी पगार, व्यवसाय सुलभता अहवालाचं निरीक्षण, दिल्ली सर्वात महागडं शहर https://goo.gl/JdmMKb



  1. RTI मध्ये सांगितले ‘मुंबई-अहमदाबाद’ रेल्वेत 40 टक्के सीट्स रिकाम्या’, आता म्हणतात, ट्रेन फुल्ल, पश्चिम रेल्वेची कोलांटउडी https://goo.gl/QyJzgS



  1. डीएस कुलकर्णींची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार, पुणे आणि मुंबईतल्या घरी पोलीस दाखल, गुतंवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप https://goo.gl/9sdURM



  1. एखाद्या पालिका आयुक्ताला जेलमध्ये टाकल्याशिवाय सुधारणा होणार नाही, बेकायदेशीर मंडपावरील याचिकेवरुन नवी मुंबई, मुंबई आणि कल्याण- डोंबिवली महापालिकेला हायकोर्टाने फटकारलं https://goo.gl/YWHjmg



  1. पंढरपुरातील 70 लाखांच्या दरोड्याची उकल, मॅनेजरची भूमिका संशयास्पद, राजकीय नेत्याच्याही समावेशाची शक्यता https://goo.gl/ioqcGa



  1. 15 दिवसात माझं ट्विटर अकाऊंट सुरु केलं नाही, तर आत्महत्या करेन, अभिनेता केआरकेची धमकी, ट्विटरने फसवणूक केल्याचाही आरोप https://goo.gl/LNAoCq



  1. शाहरुखला शुभेच्छा देणं चाहत्यांना महागात, ‘मन्नत’बाहेर शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या फॅन्सच्या मोबाईल, पाकिटावर चोरट्यांचा डल्ला https://goo.gl/s2T3wj



  1. ब्रम्हांडात पृथ्वीसारखे राहण्यायोग्य तब्बल 20 ग्रह, दुर्बिणीच्या सहाय्याने नासाचा शोध, एलियनचा अधिवास असण्याचीही शक्यता https://goo.gl/TaZFMz


माझा कट्टा : फेरीवाल्यांना पाठिंबा देणारे काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्याशी गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता, @abpmajhatv वर


स्पेशल रिपोर्ट : शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या डीएसकेंचं असं का झालं? https://goo.gl/XYPjxY

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv *पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर