एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 जानेवारी 2019 | बुधवार
  1. हिंदुत्वासाठी एक व्हा, अमित शाहांची उद्धव ठाकरेंना गळ, शिवसेना-भाजप युतीसाठी फोन केल्याची सूत्रांची माहिती https://goo.gl/76NDQC
 
  1. प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडी करण्यासाठी हालचालींना वेग, काँग्रेस 6 जागा देण्याची शक्यता, दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु https://goo.gl/q5UQeE
 
  1. शिवसेना-भाजपकडून स्वतंत्रपणे लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका, शिवसेना पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर चर्चा तर वर्षावर भाजप नेत्यांच्या बैठका https://abpmajha.abplive.in/
 
  1. मराठा आणि कुणबी स्वतंत्र नाही तर एकच जात, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट करायला हवे, मागास प्रवर्ग आयोगाच्या अहवालातील मुद्दे आणि शिफारशी समोर https://abpmajha.abplive.in/
 
  1. केंद्रात लोकपाल नियुक्तीसाठी अण्णा हजारेंचा एल्गार, आजपासून राळेगणसिद्धीमध्ये आमरण उपोषण, गिरीश महाजनांची शिष्टाई निष्फळ https://goo.gl/bmgJXW
 
  1. मोदी सरकार यंदा अंतरिम नाही तर पूर्ण अर्थसंकल्प मांडणार असल्याची सूत्रांची माहिती, निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घोषणांची शक्यता https://goo.gl/pravkQ
 
  1. मुंबईतील वाहतूक कोंडीचा परीक्षार्थींना फटका, न्यू इंडिया अश्यूरन्स असिस्टंट ऑफिसर पदासाठीच्या परीक्षेला उशिरा पोहोचल्याने 30 ते 40 उमेदवारांना परीक्षा देण्यास मज्जाव https://goo.gl/eRv56g
 
  1. पुण्यात मुळशी पॅटर्नप्रमाणे गुंडगिरीचा थरार, केवळ रागात पाहिल्याने तरुणाचा शस्त्र घेऊन पाठलाग करणारी टोळी कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/CfxPiH
 
  1. पाकिस्तानी सुफी गायक राहत फतेह अली खानवर विदेशी चलनाच्या तस्करीचा आरोप, ईडीकडून कारणे दाखवा नोटीस https://goo.gl/a2NNBP
 
  1. टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्याची शाश्वती कमी, वेगवेगळ्या गटात असल्याने भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहत्यांना नॉकआऊटपर्यंत वाट पाहावी लागणार https://goo.gl/eezDeZ
  माझा विशेष : मराठा हे ‘ओबीसी’च! पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता, फक्त ‘एबीपी माझा’ वर यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatvइन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatvफेसबुक - https://www.facebook.com/abpmajhaट्विटर - https://twitter.com/abpmajhatvव्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.htmlएबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajhaAndroid/iOS App ABPLIVE