एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 02  जुलै 2019 | मंगळवार

  1. मुंबईसह उपनगरात पावसाची दमदार बॅटिंग, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी, जनजीवन विस्कळीत, दिवसभर मध्य रेल्वे ठप्प, पश्चिम रेल्वे उशिराने, दिवसभरात पावसाचा जोर तुलनेने मंदावला 


 

  1. येत्या 48 तासांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा, मुंबई आणि उपनगरांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता 


 

  1. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून मुंबई-पुण्यात मृत्यूचं तांडव, मालाडमध्ये 21 जणांचा बळी  पुण्यात कात्रजमध्ये सहा मजुरांचा मृत्यू  कल्याणमध्येही तिघांचा मृत्यू, तर मुंबईत सबवेमध्ये स्कॉर्पिओ अडकल्याने दोघांचा मृत्यू 


 

  1. मुंबईत साचलेलं तुलसी-विहारच्या एकत्रित क्षमतेपेक्षा जास्त पाणी सहा पंपिंग स्टेशनमधून समुद्रात सोडलं, रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष केल्याने ट्विटराईट्सचा संताप


 

  1. मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, विरोधकांची मागणी, नालेसफाईवरुन शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न


 

  1. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी, सूत्रांची माहिती, लवकरच अधिकृत घोषणा होणार


 

  1. मुंबईतील मुसळधार पावसाचा टीव्ही इंडस्ट्रीलाही फटका, फिल्मसिटीसह मालिकांच्या सेटवर पाणी साचल्याने शूटिंग रद्द करण्याची नामुष्की 


 

  1. गोंदियात शिक्षिकेची पतीकडून भरदिवसा शाळेत घुसून निर्घृण हत्या, हत्येनंतर आरोपी पती फरार, कारण अस्पष्ट


 

  1. तुकोबांच्या पालखीचा आज बारामतीमध्ये मुक्काम, तर नीरा स्नानानंतर ज्ञानोबा माऊलींची पालखी लोणंद मुक्कामी


 

  1. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, खणखणीत शतक झळकावत रोहित शर्माची संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK