एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 29 नोव्हेंबर 2018 | गुरुवार

  1. मराठा आरक्षणाच्या विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजुरी, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के आरक्षणाचा निर्णय, शिवसेना आणि भाजपचं विधिमंडळ परिसरात जोरदार सेलिब्रेशन https://goo.gl/GzDzRw


 

  1. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांचं उपोषण मागे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ, उद्धव ठाकरेंचं आश्वासन https://goo.gl/gtdqPz


 

  1. मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्यासाठी वकिलांची फौज उभी करु, विनोद तावडेंची माहिती, तर 16 टक्के आरक्षणात कुणबी नाहीत, चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण https://goo.gl/RpNK2N


 

  1. मराठा आरक्षण हा माझाच विजय, मला श्रेय द्यायला पाहिजे, राणे समितीने सुचवलेल्या शिफारसी सरकारने कायम ठेवल्या, नारायण राणेंचा श्रेयवाद, तर श्रेय लाटण्याआधी आरक्षणाची अंमलबजावणी करा, अजित पवारांचा खोचक टोला https://goo.gl/ewKmxV


 

  1. मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणाच्या मागणीला जोर, संवैधानिक बाबींची पूर्तता करुन आरक्षणाची शिफारस करु, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन https://goo.gl/RpNK2N


 

  1. मराठा आऱक्षण मिळाल्यानंतर भाजपचं जोरदार सेलिब्रेशन, नाशिक, औरंगाबादेत आतषबाजी, राज्यभर बॅनरबाजी करण्याचे भाजपचे आदेश https://goo.gl/RpNK2N


 

  1. ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर स्वस्थ बसणार नाही, ओबीसी नेत्यांचा पुन्हा एकदा भाजपला इशारा, सरकारवर विश्वास नसल्याचाही आरोप https://goo.gl/d5njFK


 

  1. इस्रोची पुन्हा एकदा गगनभरारी, 8 देशांचे 30 उपग्रह घेऊन पीएसएलव्ही सी-43 अवकाशात झेपावलं https://goo.gl/pFhr9N


 

  1. देशभरातील 200 शेतकरी संघटनांचा मोर्चा दिल्लीत धडकला, उद्या रामलीला मैदान ते संसद मार्ग भव्य मोर्चाचं आयोजन https://goo.gl/wpLZQY


 

  1. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास विवाहसोहळ्यासाठी राजस्थानात दाखल, 1 डिसेंबर रोजी जोधपूरमध्ये प्रियांका-निकचा शाही विवाहसोहळा https://goo.gl/Jqa8ws


BLOG : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांच्या ब्लॉग, फूडफिरस्ता : रस्त्यावरचं खाणं पुण्यातलं - थोडा भूतकाळ, थोडं वर्तमान - भाग 1 https://goo.gl/bzRrm5


*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE*

*'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरू नका.* http://www.majhawhatsapp.com/