एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 27 ऑक्टोबर 2018 | शनिवार

  1. नक्षल कनेक्शनप्रकरणी पुणे पोलीस रात्रभर मानवाधिकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांच्या हरियाणातील घराबाहेर, सकाळी भारद्वाज यांना अटक, वर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरांना 6 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी https://goo.gl/7mpdgV


 

  1. 15 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना राज्यात फिरकूही देणार नाही, मराठा क्रांती मोर्चाचा राज्य सरकारला अल्टिमेटम https://goo.gl/KquBJk


 

  1. अधिकारांचा गैरवापर केल्यास जेलमध्ये जावं लागेल, नागपुरात महापौर परिषदेत नितीन गडकरींची फटकेबाजी, मुंबईच्या महापौरांनाही चिमटे https://goo.gl/WydXP1


 

  1. मुंबई, पुणे, नवी मुंबई, लातूर, नागपूरसह अनेक बाजार समित्या राष्ट्रीय बाजार म्हणून घोषित, संचालक मंडळांवर बरखास्तीची टांगती तलवार  https://abpmajha.abplive.in/


 

  1. नालासोपाऱ्यातील एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ असल्याचं वाटत नाही, जोगिंदर राणा एन्काऊंटर संदर्भात हायकोर्टाकडून प्रश्नचिन्ह, पालघर पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश https://abpmajha.abplive.in/


 

  1. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाबद्दल स्पष्ट बोलल्यानेच उद्धव ठाकरेंना कोल्हापुरी मिरची झोंबली, अजित पवारांचं कोल्हापुरात शिवसेनेवर टीकास्त्र https://goo.gl/nwyeYJ


 

  1. आम्ही 2019 मध्ये 2014 ची फक्त पुनरावृत्तीच करणार नाही, तर त्यापेक्षा जास्त जागा आणणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास https://goo.gl/x1i2D5


 

  1. मराठवाड्याला पाणी सोडण्याचा मुद्दा पेटला, राहत्यामध्ये पालकमंत्री राम शिंदेंची गाडी शिवसेनेने अडवली, समन्यायी पाणी वाटप कायदा रद्द करण्याची मागणी https://goo.gl/qvAFrt


 

  1. हिरानंदानी बिल्डरकडे खंडणीसाठी तगादा, ठाण्यात भाजप नेते सुधीर बर्गे यांच्यासह तिघांना अटक, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाची कारवाई https://goo.gl/HHJrxT


 

  1. ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांना हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार, संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव https://goo.gl/RfUC6v


 

*माझा कट्टा* :  भाजपचा जुना चेहरा यशवंत सिन्हा यांच्याशी खास गप्पा, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर

*एबीपी माझाचे अपडेट्स मेसेंजरवरही मिळवण्यासाठी m.me/abpmajha लिंकवर जाऊन फक्त START मेसेज पाठवा*

*एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhatv  

*एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - https://www.instagram.com/abpmajhatv 

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*