एबीपी माझाचं  व्हॉट्सअॅप बुलेटीन 27/02/2018

  1. श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबतच्या सर्व शंकांना अखेर पूर्णविराम, दुबईतल्या तपास यंत्रणांकडून केस बंद, बोनी कपूर यांना क्लीन चिट, अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव आज रात्री उशिरापर्यंत मुंबईत येणार https://goo.gl/Tjmota


 

  1. 'श्रीदेवीचा मृत्यू संशयास्पद, पार्थिव भारतात आल्यावर पुन्हा शवविच्छेदन व्हावं', दाऊदच्या प्रॉपर्टीसाठी बोली लावणारे पत्रकार बालकृष्णन यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://goo.gl/xxEfm8 , श्रीदेवी मद्यसेवन करत नव्हती, ही हत्या आहे, सुब्रमण्यम स्वामी यांचा आरोप https://goo.gl/6aP9vn


 

  1. जिल्हा बँकांच्या नोटा बदलून न दिल्याने 112 कोटींच्या ठेवी बुडीत, सामान्य नागरिकांनाच फटका, शरद पवार आक्रमक, सुप्रीम कोर्टात जिल्हा बँकांची बाजू पी. चिदंबरम मांडतील, पवारांची माहिती https://goo.gl/9Nin8t


 

  1. कमला मिल हे मागच्या सरकारचं पाप, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर आरोप, मुंबईतील कमला मिल्स अग्नितांडव प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी https://goo.gl/35kkbw


 

  1. 13 वेगवेगळ्या देशातील तरुणांकडून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा, इंडियन स्टोरी टेलर युट्यूब चॅनलकडून अनोखा उपक्रम https://goo.gl/rtZWXW


 

  1. मुंबईतील एलफिन्स्टन पुलाच्या उद्घाटनाआधी मुख्यमंत्र्यांनी केला लोकलनं प्रवास, रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लष्कराने बांधलेल्या एलफिन्स्टन पुलाचं उद्घाटन https://goo.gl/hRDTJf


 

  1. 'मराठी अभिमान गीताचं सातवं कडवं सरकारने गाळलं', विरोधकांचा आरोप, विधानसभेत प्रचंड गदारोळ https://goo.gl/ynqPCB , तर सातवं कडवं मूळ कवितेत नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा


 

  1. मुख्यमंत्र्यांच्या नदी बचाव व्हिडिओसाठी टी सीरिज कंपनीची निवड का? काँग्रेसचा सवाल, विरोधकांनाही नाचायला बोलवण्याची खोचक मागणी https://goo.gl/tMAkKr


 

  1. अहमदनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक, काही कार्यकर्ते जखमी, शिवसेनेकडून मात्र वृत्ताचं खंडन https://goo.gl/etEHSQ


 

  1. सोलापूर-तुळजापूर रोडवरील भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू, रस्त्यावर थांबलेल्या कारला जीपची धडक, तर बुलडाण्यात अपघातात चौघांचा मृत्यू https://goo.gl/pLdvqP


 

  1. सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये म्युझिकल हाऊसच्या गोदामाला भीषण आग, लाखो रुपये किमतीच्या सतारी जळून खाक https://goo.gl/JRLb31


 

  1. बारावीचे 65 लाख पेपर तपासणीशिवाय पडून, शिक्षकांचं आंदोलन सुरुच, पेपर तपासणीवर बहिष्कारामुळे निकाल लांबणीवर पडण्याची चिन्हं https://goo.gl/SFLcmF


 

  1. आता 5 वर्षांखालील लहानग्यांना निळ्या रंगाचं आधार कार्ड मिळणार, UIDAI ची माहिती https://goo.gl/DBtvYu


 

  1. बार्सिलोनातील मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये ‘गॅलेक्सी S9’ आणि ‘S9 प्लस’ स्मार्टफोनचं लॉन्चिंग, भारतातही बुकिंग सुरु https://goo.gl/MUkNbD


 

  1. साहित्य संमेलनांमधील उथळपणा टाळून वाचकांशी सुसंवाद व्हावा, माझा साहित्य संमेलनात अरुणा ढेरेंची अपेक्षा, राज्यभरात मराठीदिनाचा जागर https://goo.gl/Ugq9iT


 

माझा विशेष : श्रीदेवी मृत्यू प्रकरणात माध्यमांनी कव्हरेजचा अतिरेक केला आहे का? आज रात्री 9 वाजता

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा