एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 26 ऑक्टोबर 2019 | शनिवार


1. मुख्यमंत्रीपदासह महत्त्वाच्या खात्यांसाठी शिवसेना आक्रमक, तर सत्तेत समान वाटा न मिळाल्यास सर्व पर्याय खुले, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा 

2. महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री होईल, भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांचा दावा 

3. निवडून आलेल्या उमेदवारांनाच मंत्रिमंडळात प्राधान्य द्या, शिवसेना आमदारांचा आग्रह, तर बुजूर्ग नेत्यांसाठी मार्गदर्शक पद निर्माण होण्याची शक्यता 

4. काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी पक्षाची भूमिका निभावणार, बारामतीत शरद पवार आणि बाळासाहेब थोरातांमध्ये बैठक, विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच 

5. माझ्या घराचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतील, परळीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट व्हायरल 

6. औरंगाबाद-जळगाव महामार्ग अनेक तासांपासून ठप्प, खड्ड्यांमुळे वाहनं अडकली, दोन्ही बाजूने 7 किलोमीटरपर्यंत रांगा 

7. 'क्यार' वादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा, भातशेतीचं मोठं नुकसान, कोकणात हाय अलर्ट 

8. विदर्भ-मराठवाड्याला पावसाचा फटका, सोयाबीन, कापसासह द्राक्षांचं मोठं नुकसान तर कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा 

9. भाव नसल्याने शेतकऱ्यांनी फुलं रस्त्यावर फेकली, कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील रस्त्यांवर फुलांचा खच, मुलांची दिवाळी कशी होणार? शेतकऱ्यांचा उद्विग्न सवाल 

10. दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्या, सोनंखरेदीला जोर, प्रतितोळा दर चाळीशीच्या घरात 

BLOG : विधीमंडळावर भगवा फडकवायला जाणाऱ्या शिवसेनेच्या मनातला मराठी माणूस आहे तरी कसा? एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी यांचा ब्लॉग