एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25 जून 2019 | मंगळवार
1. मुंबईकरांचा प्रवास 'बेस्ट' होणार, प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढीसाठी बेस्ट प्रशासनाचा तिकीटदर कमी करण्याचा निर्णय, किमान तिकीट पाच रुपयांवर
2. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांचं भाकीत, 15 सप्टेंबरपासून आचारसंहिता सुरु होण्याचाही दावा
3. खासदार नवनीत कौर राणा अमित शाहांच्या भेटीला, भाजपप्रवेशाच्या चर्चांना उधाण, रवी राणांचंही सूचक वक्तव्य
4. चौकशी सुरु असतानाच राज्यमंत्री अर्जुन खोतकरांकडून सुभाष देशमुखांच्या लोकमंगलला क्लीन चिट, व्याजासकट पैसे परत केल्याचाही दावा
5. मेहूल चोक्सीचं नागरिकत्व अँटिग्वा सरकार रद्द करणार, अँटिग्वाच्या पंतप्रधानांची माहिती, चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा
6. यंदाही भिडे गुरुजींच्या शिवप्रतिष्ठानला वारीत पालखीसमोर चालण्यास परवानगी नाही, पालखी सोहळा समितीचं पोलिसांना पत्र
7. ज्ञानोबांच्या पालखीचं आळंदीहून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान तर तुकोबांची पालखी आकुर्डी मुक्कामी, वारकरी भक्तिसागरात दंग
8. कबीर सिंग सिनेमाचं प्रक्षेपण तात्काळ थांबवा, डॉ. प्रदीप गाडगेंचं आरोग्यमंत्र्यांना पत्र, डॉक्टरांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप
9. राज्यभरात 50 हून अधिक गुन्हे असलेल्या टकटक गँगला अखेर कल्याण पोलिसांकडून बेड्या, बँकेवर दरोड्याच्या तयारीत असताना मुसक्या आवळल्या
10. महाराष्ट्राचं चेरापुंजी अशी ओळख असलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील किटवडे गाव अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत, मुंबई, कोकणातील बहुतांश भागही कोरडा, तर सांगलीत महिनाभराचा पाऊस एका दिवसात
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK