एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 सप्टेंबर 2019 | मंगळवार

  1. पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर आरबीआयकडून निर्बंध, ग्राहकांना खात्यातून हजार रुपयेच काढता येणार, बँकांसमोर ग्राहकांची गर्दी, परिस्थितीवर मात करु, पीएमसी बँकेच्या प्रमुखांचा विश्वास 


 

  1. आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडवरुन पर्यावरणप्रेमींची अजब भूमिका, फुकटची जागा सोडून रॉयल पाम या खाजगी विकासकाच्या जागेसाठी आग्रह


 

  1. अमित शाहांचा 26 सप्टेंबरचा मुंबई दौरा रद्द, शाहांच्या उपस्थितीत युतीच्या घोषणेची शक्यताही मावळली, तर शिवसेना-भाजप युतीची बोलणी अंतिम टप्प्यात, लवकरच घोषणा करणार चंद्रकांत पाटलांचे सकारात्मक संकेत 


 


4.योग्य पर्याय मिळाला तर भाजपचा पराभव शक्य, माझाच्या तोंडी परीक्षेत अब्दुल सत्तार यांचा भाजपला टोला, पृथ्वीराज चव्हाणांवरही टीकास्त्र

  1. शरद पवार साताऱ्यातून निवडणुकीला उभे राहिले तर मी माघार घेईन, पवारांवर आजही प्रेम करतो म्हणत उदयनराजेंना अश्रू अनावर 



  1. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरला, आगामी विधानसभा निवडणुकांसोबतच लोकसभेची पोटनिवडणूक होणार, उदयनराजेंना दिलासा 


 

  1. वंचित-एमआयएमच्या युतीची शक्यता धूसर, एमआयएमकडून मुंबईतील पाच उमेदवारांची घोषणा , तर वंचित बहुजन आघाडीची 22 उमेदवारांची पहिली यादी जाहीर 


 

  1. अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा, काँग्रेस नेते सचिन सावंत आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा गंभीर आरोप



  1. जम्मू-काश्मीर, चंदीगड, दिल्लीसह पाकिस्तानात भूकंपाचे धक्के, रावळपिंडीत भूकंपाचा केंद्रबिंदू, पाकव्याप्त काश्मीरमध्ये 5 जणांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी 


 

  1. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा तोंडघशी, काश्मीरप्रश्नी भारत तयार असेल तरच मध्यस्थी करणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार 


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK