एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 22/12/2017

  1. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विजय रुपाणींची वर्णी, तर उपमुख्यमंत्रीपदी नितीन पटेल, भाजप आमदारांच्या बैठकीत शिक्कामोर्तब https://goo.gl/Ni3dRB


 

  1. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन एकनाथ खडसेंनी सरकारला झापलं, तर कायदा-सुव्यवस्थेवरुन विखे-पाटलांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं https://goo.gl/jch3nQ


 

  1. राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती, सरकारची मदत नाही, लोकांनी मरायचं का?, विधानसभेत एकनाथ खडसेंचा संतप्त सवाल, खडसेंच्या बोलण्यात तथ्य, मात्र केंद्राचे निकष अधिक कडक, लवकरच निर्णय घेऊ, चंद्रकांत पाटील यांचं उत्तर https://goo.gl/3Q34ii


 

  1. आदर्श घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना मोठा दिलासा, राज्यपालांनी दिलेले चौकशीचे आदेश हायकोर्टाकडून रद्द https://goo.gl/3xoDvQ


 

  1. डीएसकेंच्या अटकपूर्व जामीनावर सरकारी वकिलांचा युक्तीवाद न झाल्यानं उच्च न्यायालयाचा अद्याप निर्णय प्रलंबित, 50 कोटी रुपये मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातून डीएसकेंना 18 जानेवारीपर्यंतची मुदत http://abpmajha.abplive.in/


 

  1. सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव, कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय झाल्याची आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरांची माहिती https://goo.gl/DwQH4n


 

  1. ठाणे-नवी मुंबईकरांचा खोळंबा, कळवा-विटावा रस्ता वाहतुकीसाठी 4 दिवस बंद, तर हार्बर मार्गावर बेलापूर-उरण मार्गाच्या कामासाठी नेरुळ ते पनवेल तीन दिवसांचा मेगाब्लॉक https://goo.gl/nyRtL6


 

  1. नाशिकमध्ये रुममेट्सच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेल्या चारही रुममेट्सवर गुन्हा दाखल https://goo.gl/59xYC8


 

  1. पुण्यात आठ वर्षांच्या चिमुकलीवर चार महिन्यांपासून सामूहिक बलात्कार, 18 वर्षीय आरोपीसह पाच अल्पवयीन मुलं ताब्यात https://goo.gl/N2oMvZ


 

  1. अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राचा विद्युत व्यवसाय अदानींकडे, प्रकल्पाच्या विक्रीतून आलेल्या पैशाचा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी वापर करणार, रिलायन्सने ग्राहकांकडून वसूल केलेल्या 1452 कोटींची भरपाई कोण करणार यावर अजूनही संभ्रम https://goo.gl/a8SGbd


 

  1. वेस्टर्न कमोडऐवजी इंडियन टॉयलेट वापरा, ते आरोग्यासाठी फायदेशीर, बोहरा धर्मगुरुंचं आवाहन https://goo.gl/5A3w7q


 

  1. डॉक्टरांच्या सुचनेनुसार हवी तेवढीच औषधं मिळणार, मोठ्या स्ट्रिप्सची सक्ती नाही, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे विक्रेत्यांना आदेश https://goo.gl/QvKweH


 

  1. आणीबाणीविरोधी आंदोलनात सहभाग घेतलेल्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा, पेन्शनचाही लाभ, 2018 मधील पहिल्या कॅबिनेटमध्ये राज्य सरकार निर्णय घेणार http://abpmajha.abplive.in/


 

  1. फोर्ब्सची श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहीर, सलमान खान अव्वल, कोहली तिसऱ्या तर धोनी आठव्या स्थानी https://goo.gl/5hG19A


 

  1. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत शिवराज राक्षेसोबतच्या कुस्तीत गेल्या वर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके विजयी, दुखापतीमुळे माघार घेतलेला शिवराज रुग्णालयात, अभिजीतकडून खिलाडूवृत्तीचं दर्शन https://goo.gl/rVNfQp


 


*BLOG* :  एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग, जिभेचे चोचले : अंडे का फंडा – एव्हरीडे अंडे https://goo.gl/AD5nnv 

*माझा विशेष* : काँग्रेस पापमुक्त होतेय? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*