एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटिन | 20 नोव्हेंबर 2019 | बुधवार

 

  1. सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, महाशिवआघाडीला सोनिया गांधींची मंजुरी, सूत्रांची माहिती, तर शरद पवारांच्या निवासस्थानी आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठक https://bit.ly/2QwHVeW


 

  1. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात पाऊण तास चर्चा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची पवारांची मागणी, तर पवारांच्या भेटीनंतर नरेंद्र मोदी आणि अमित शाहांमध्ये बैठक https://bit.ly/2KEznPv


 

  1. शिवसेनेच्या नेतृत्वात चार ते पाच दिवसांत सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल, शिवसेना खासदार संजय राऊतांना विश्वास, तर उद्या दुपारपर्यंत सत्तास्थापनेचं चित्र स्पष्ट होण्याची आशा https://bit.ly/2KC45Ze


 

  1. आमदार फोडायचा प्रयत्न केला तर डोकी फोडू, शिवसेना आमदार अब्दुल सत्तारांचा इशारा, आठवड्याभरात महाशिवआघाडीचं सत्तास्थापन होणार असल्याचा पुनरुच्चार https://bit.ly/3493t5e0020


 

  1. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्राचं पथक उद्या महाराष्ट्रात, पाच सदस्यीय पथक तीन दिवस विभागवार पाहणी करणार, पंचनामे पूर्ण झाल्यावर केंद्राला मदतीचा प्रस्ताव https://bit.ly/2qjsCeZ


 

  1. सोनसाखळी चोरांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर गोळीबार, जखमी अवस्थेत पोलिसांची जिगरबाज कारवाई, एका आरोपीला अटक https://bit.ly/2KEWGIH


 

  1. खंडणीसाठी अपहरण केलेल्या तरुणाची विवस्त्र धिंड, पुण्यातील कॅम्प परिसरातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून पाच आरोपींना अटक https://bit.ly/2OvgsaL


 

  1. नाशिकमध्ये आरबीएल बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 16 लाख रुपयांचा गंडा, कार्ड अॅक्टिवेशनसाठी ओटीपी मागून 32 ग्राहकांची फसवणूक, सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखलhttps://bit.ly/35kBmQE


 

  1. जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांना तात्पुरता जामीन, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/2OxPEH1


 

  1. भारतीय संघासाठी ऐतिहासिक क्षण, 22 ते 26 नोव्हेंबरला होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदाच गुलाबी चेंडूवर कसोटी खेळवणार, सामन्याबाबत क्रिकेटरसिकांमध्ये उत्सुकता https://bit.ly/2O3nNzb


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK