*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 मार्च 2019 | बुधवार*

*एबीपी माझाच्या वाचक आणि प्रेक्षकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा*

  1. पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीला लंडनमध्ये बेड्या, बँकांना 14 हजार कोटींचा चुना लावणाऱ्या नीरवच्या प्रत्यार्पणावर लंडन कोर्टात सुनावणी https://goo.gl/Chn3jE


 

  1. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत रणजितसिंह मोहिते भाजपमध्ये दाखल, लोकसभेसाठी माढ्यातून उमेदवारीचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, पुढील चर्चा विजयसिंह मोहिते पाटलांशीच होईल, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण https://goo.gl/KL4LHR




  1. होलाष्टकामुळे भाजपच्या उमेदवारांची यादी लांबणीवर, सूत्रांची माहिती, तर काँग्रेसकडून महाराष्ट्रातील आणखी 7 उमेदवारांची घोषणा https://goo.gl/1JtQtm


 

  1. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर हात उगारणं नगरसेवकाला महागात, बेकायदेशीर होर्डिंग लावणाऱ्या नगरसेवकाला हायकोर्टाकडून 24 लाखांचा भुर्दंड https://goo.gl/WQXhjf


 

  1. समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्य आरोपी स्वामी असीमानंदसह चारही आरोपींची निर्दोष मुक्तता, पंचकुलातील एनआयए कोर्टाचा निर्णय https://goo.gl/YtSqNM


 

  1. भिवंडीत विज्ञानापाठोपाठ समाजशास्त्राचाही पेपर वायरल, दहावीची परीक्षा सुरु होण्यापूर्वी अर्धातास आधीच पेपर फुटला https://goo.gl/TkQnJN


 

  1. 'खाता ना बही, जे काँग्रेस म्हणेल तेच सही', पंतप्रधान मोदींचा ब्लॉगद्वारे हल्लाबोल, प्रियांका गांधींचाही मोदींवर पलटवार https://goo.gl/2wA4uw


 

  1. निवृत्त न्यायमूर्ती पी सी घोष देशाचे पहिले लोकपाल, राष्ट्रपतींकडून नियुक्ती, पुढील चार वर्ष लोकपालपदी नियुक्त राहणार, तर राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांची लोकपालच्या सदस्यपदी नियुक्ती https://goo.gl/XdEp8m


 

  1. गोव्यात भाजपने बहुमताचा ठराव जिंकला, 20 आमदारांच्या पाठिंब्यानं डॉ. प्रमोद सावंताच्या सरकारचा धोका टळला https://goo.gl/TkQnJN


 

  1. आजपासून राज्यासह कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात, वरळी कोळीवाड्यात कोळी बांधवांचा पारंपरिक गाण्यांवर ठेका, तर फणसाच्या झाडाला ग्रामदैवत मानत तळकोकणातल्या सांगेलीत आगळावेगळा शिमगोत्सव https://goo.gl/HXTWX1


 

*माझा कट्टा* : होळीनिमित्त डॉ. निलेश साबळे आणि श्रेया बुगडे दिलखुलास गप्पा ‘माझा कट्टा’वर आज रात्री 9 वाजता

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* https://goo.gl/enxBRK