एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 20/08/2018


 

1. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे हेच मास्टरमाईंड, तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर शूटर, सीबीआयचा कोर्टात दावा https://goo.gl/UqcqMQ

2. नालासोपारा स्फोटक प्रकरणात जालन्याच्या श्रीकांत पांगारकरचीच आर्थिक मदत, महाराष्ट्र एटीएसचा मुंबई सत्र न्यायालयात दावा, पांगारकरला 28 ऑगस्टपर्यंत कोठडी https://goo.gl/6YCFYc

3. केरळातील पूर ओसरण्यास सुरुवात झाल्याने मदत कार्याला वेग, महाराष्ट्रातून 110 डॉक्टरांसह वैद्यकीय शिक्षणमंत्री  गिरीश महाजन केरळात https://goo.gl/AXvHfL
4. मुंबईसह राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, गडचिरोलीत संततधार पावसामुळे 130 गावांचा संपर्क तुटला, तर चंद्रपुरातही जनजीवन विस्कळीत, सांगलीतील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ https://goo.gl/Qzh66h

5. ठाण्यात मुंब्रा बायपास कामाने प्रचंड वाहतूक कोंडी, मुलुंड, ऐरोली टोल नाक्यांवरील टोल रद्द, वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय https://goo.gl/46Fsj4

6. भाजपच्या संगीता खोत सांगलीच्या नव्या महापौर, तर धीरज सूर्यवंशी उपमहापौर, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे जल्लोष न करण्याचा निर्णय https://goo.gl/i1sQth

7. 'गगनयान' मोहीमेची जबाबदारी महिला वैज्ञानिक डॉ. व्हीआर ललितांबिका यांच्याकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केली होती मोहीमेची घोषणा https://goo.gl/9qNWud

8. छत्तीसगडच्या हिंदू तरुणीशी लग्न करण्यासाठी मुस्लीम तरुणाचं धर्मांतर, धर्मांतरानंतरही मुलीच्या पालकांचा विरोध, तरुणाची सुप्रीम कोर्टात धाव https://goo.gl/5B6Rpb

9. एशियाडमध्ये दुसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात एक सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं, महिला पैलवान विनेश फोगाटला कुस्तीत सुवर्ण, नेमबाज दीपककुमारची 10 मी. एअर रायफलमध्ये तर नेमबाज लक्ष्यची ट्रॅप प्रकारात रौप्य पदकाची कमाई https://goo.gl/Q6Uwx5

10. टीम इंडियाची नॉटिंगहॅम कसोटीवरची पकड आणखी मजबूत, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांनी भारताच्या आघाडीला आणखी बळ https://goo.gl/E94X13

राजीव गांधी जयंती विशेष : राजीव गांधी यांच्या आयुष्यातील 10 महत्त्वाचे टप्पे https://goo.gl/HyKvHD

माझा विशेष : बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता

एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv

एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा