*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 जून 2019 | बुधवार*

  1. विश्वचषकात टीम इंडियाला मोठा धक्का, अंगठ्याच्या दुखापतीमुळे सलामीवीर शिखर धवन विश्वचषकातून बाहेर, रिषभ पंतला संधी


 

  1. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी वेबसाईटचा सर्व्हर डाऊन, विद्यार्थी आणि पालकांसमोर अडचण, सर्व्हर सुरु होण्याची प्रतीक्षा


 

  1. मान्सून लांबल्याने मुंबईसह पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला, पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन


 

  1. पुढील वर्धापन दिनाला शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, सामनातून दावा, आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचा सोहळा


 

  1. नाणारचा प्रकल्प आता रायगडमध्ये उभारणार, स्थानिकांचा भूसंपादनाला विरोध नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत लेखी उत्तर, तर अर्थसंकल्प लीक प्रकरणाची चौकशी सायबर क्राईम कायद्यातून करण्याची विरोधकांची मागणी


 

  1. मुंबईत अनधिकृत पार्किंगला तब्बल 10 हजार रुपयांचा दंड, पालिका आयुक्त प्रवीण परदेशींचे निर्देश, पुढील महिन्यापासून अंमलबजावणी


 

  1. नागपूरच्या 'सावजी'मध्ये सरकारकडून दारुची परवानगी, एका महिन्यात परवान्यासाठी तब्बल दीडशे अर्ज 


 

  1. जगप्रसिद्ध कोल्हापुरी चपलांचा जीआय मानांकनाने गौरव, कारागिरांच्या प्रयत्नांना मोठं यश


 
9.   बिहारमध्ये चमकी तापाचा कहर सुरुच, आतापर्यंत 132 मुलं दगावली, मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान नागरिकांचा रोष

 

  1. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, वन नेशन वन इलेक्शनवर चर्चा, ममता, मायावती, केजरीवालांचा मात्र बहिष्कार


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK