एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 जुलै 2019 | गुरुवार

1. शिवसेनेचा शेतकऱ्यांसाठी पीकविमा कंपन्यांविरोधात एल्गार, येत्या बुधवारी मुंबईत 'इशारा मोर्चा', मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या महापूजेला पंढरपूरला जाणार नसल्याची उद्धव ठाकरेंची माहिती 

2. वैद्यकीय प्रवेशात यंदा मराठा आरक्षण लागू होणार, विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली 

3. केंद्र सरकार गॅस सिलेंडरप्रमाणे रेल्वे तिकीटांवरील सबसिडी सोडण्याचे आवाहन करणार, उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार रेल्वेसाठीही 'गिव्ह इट अप' योजना लागू करण्याच्या तयारीत 

4. अयोध्या प्रकरणी 25 जुलैपासून पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता, मध्यस्थी कमिटीला अहवाल एका आठवड्याच्या आत देण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश 

5. दलित तरुणाशी लग्न केल्याने वडिलांपासून जीवाला धोका, उत्तर प्रदेशमधील भाजप आमदार राजेश मिश्र यांच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल, मुलीला तातडीचा दिलास देण्यास हायकोर्टाचा नकार 

6. मुंबईतल्या गोरेगावमध्ये गटारात दीड वर्षाचा मुलगा वाहून गेला, तर मुंबईकरच गटारांची झाकणं उघडी ठेवत असल्याचा महापौर महाडेश्वरांचा आरोप 

7. अल निनोचा प्रभाव कमी झाल्यामुळे सरासरी पाऊस बरसणार, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, नद्यांना पूर 

8. शाळेच्या वाटेत छातीभर पाणी आणि डोक्यावर दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेत, मुरबाड तालुक्यातील बांगरवाडीच्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास 

9. गानसम्राज्ञी लता मंगेशकरांची एमएस धोनीला निवृत्ती न घेण्याची विनंती, देशाला धोनीची गरज असल्याचे लतादीदींचे ट्वीट 

10. आषाढी एकादशीसाठी पंढरपूर सज्ज, विठ्ठलाच्या दर्शनासाठी 7 किलोमीटरच्या रांगा, तर एकादशीनिमित्त विठुरायाच्या दरबारी राजकीय पुढाऱ्यांची मांदियाळी 

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

मेसेंजर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK