एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 7 जानेवारी 2019 | सोमवार
  1. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना शिक्षण-नोकरीत 10 टक्के आरक्षण, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, 50 टक्क्याची मर्यादा उठवण्यासाठी घटनादुरुस्तीचा प्रस्ताव, तर आरक्षण टिकणार नसल्याचा घटनातज्ज्ञांचा दावा https://goo.gl/448mds
 
  1. रोडरोमियोंसारखे आमच्या मागे कशाला लागता, आम्हाला तुमच्यात रस नाही, अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांचा घणाघात https://goo.gl/GECpTg
 
  1. साहित्यिकांच्या बहिष्कारानंतर मनसेचीही माघार, ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना संमेलनाला येण्याचं आवाहन, तर संमेलनाच्या कुठल्याही निर्णयात हस्तक्षेप नसल्याचा सरकारचा दावा https://goo.gl/Sp1bSv
 
  1. महाराष्ट्रात आता ओपन एसएससी बोर्ड, शिक्षणमंत्री विनोद तावडेंची घोषणा, कलाकार, खेळाडूंना शाळेत न जाता थेट परीक्षेला बसता येणार https://goo.gl/tGyKG1
 
  1. राफेलवरून पंतप्रधान मोदी पुन्हा राहुल गांधींच्या निशाण्यावर, ‘चौकीदार चोर है’ याचा पुनरुच्चार, तर राहुल गांधी दिशाभूल करत असल्याचं संरक्षणमंत्र्यांचं प्रत्युत्तर https://goo.gl/x4UaMS
 
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त सोलापुरातील शिक्षक, विद्यार्थ्यांना महापालिकेनं कामाला जुंपलं, 9 तारखेपूर्वी भिंती रंगवण्याचं काम  https://goo.gl/e1t4sd
 
  1. ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डशी लिंक करणं अनिवार्य, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसादांची माहिती, बनावट लायसन्सला आळा घालण्यासाठी निर्णय https://goo.gl/okvnxc
 
  1. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा, आरोग्य खात्याचा अधिभार सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदेंकडे https://goo.gl/pmYf98
 
  1. उद्यापासून 2 दिवस बँक कर्मचाऱ्यांचा संप, सरकारच्या कामगारविरोधी धोरणांवर कर्मचारी आक्रमक, तर बेस्ट कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर https://goo.gl/ii8udR
 
  1. विराट कोहलीच्या टीम इंडियानं इतिहास घडवला; भारताचा 71 वर्षांनी ऑस्ट्रेलियात पहिला कसोटी मालिका विजय, सिडनी कसोटी अनिर्णित https://goo.gl/ttH2ix
  माझा विशेष : सवर्णांसाठी आर्थिक आरक्षण योग्य?  पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, ‘एबीपी माझा’वर यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE