एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/10/2017

  1. मनसेला खुलं आव्हान देत काँग्रेसचा फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा, मुंबईतील फेरीवाल्यांवरुन मनसे-संजय निरुपमांमध्ये राजकीय युद्ध सुरुच https://goo.gl/iaxoLN


 

  1. मुंबईतल्या फेरीवाल्यांचा प्रश्न चिघळण्यास राज्य सरकार जबाबदार महापौरांची टीका; तर अवैध फेरीवाल्यांना हटवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची धरपकड https://goo.gl/VCXQWi


 

  1. नवी मुंबईत 60 ते 70 फेरीवाल्यांवर सिडकोची कारवाई, कामोठ्यातील अतिक्रमण हटवलं https://goo.gl/U9MdNo


 

  1. मुंबईतील आझाद मैदान दंगलीच्या आरोपीने वांद्रे झोपडपट्टीत आग लावली, मास्टरमाईंड शब्बीर खानला बेड्या https://goo.gl/GBVsyN


 

  1. ईडीने आरोपपत्र दाखल केलेले नारायण राणे मंत्रिमंडळात का? शिवसेना खासदार विनायक राऊतांचा सवाल, राणेंना मंत्रीपद देण्यावर मुख्यमंत्री ठाम https://goo.gl/DB4PT8


 

  1. सत्ता भाजपच्या मालकीची, आम्ही नावापुरते; भाजपच आमचा मुख्य विरोधक, शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका https://goo.gl/AJGkss


 

  1. जीएसटी आणि नोटबंदी अर्थव्यवस्थेवरील आघात, राहुल गांधींची टीका, 8 नोव्हेंबरला काँग्रेस देशव्यापी आंदोलनाच्या तयारीत https://goo.gl/S75vWF


 

  1. 'कलम 35A'वर सुनावणी आठ आठवडे लांबणीवर, जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेलं'कलम35A' नक्की काय? या कलमावर नेमके आक्षेप कोणते? संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी https://goo.gl/k8dnPc 


 

  1. 30 प्रयत्न अयशस्वी, 31 व्या प्रयत्नात यश, अहमदाबादच्या 27 वर्षीय चक्रधर आलाकडून बुलेट ट्रेनचा लोगो तयार https://goo.gl/xzTbuE


 

  1. मुंबई-नाशिकमध्ये भाज्यांचे दर ऐंशीच्या घरात, कांदा चाळीस रुपये तर टोमॅटोने पन्नाशी गाठली, शेतकऱ्यांमध्ये समाधान https://goo.gl/i5qss6


 

  1. एक शरीर, दोन तोंडं, बीडच्या अंबाजोगाईमध्ये सयामी जुळ्यांचा जन्म; बाळ आणि बाळंतीण सुखरुप https://goo.gl/y1hNe2


 

  1. ना इंधनाची गरज, ना परमिटची, राज्यात अनेक ठिकाणी इ-रिक्षा रस्त्यावर, ‘मेक इन इंडिया’अंतर्गत इको-फ्रेंडली वाहनांची निर्मिती https://goo.gl/cWQkRc


 

  1. 'तुझ्यात जीव रंगला'चं शूटिंग थांबवा, कोल्हापूरच्या वसगडे गावकऱ्यांची मागणी, चित्रीकरणावेळी गर्दीमुळे मनस्ताप होत असल्याची तक्रार https://goo.gl/nb8LqR


 

  1. हिंदी 'सारेगमप लिटील चॅम्प'मध्ये मराठी झेंडा, अहमदनगरच्या अंजली गायकवाडला विजेतेपद https://goo.gl/uhE32d


 

  1. आयसीसी वन डे रँकिंगमध्ये विराट कोहली पुन्हा अव्वल, तर मोठी झेप घेत जसप्रीत बुमरा गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर https://goo.gl/tmQuPv


 


*माझाव्हिजन समिट : विचारमंथन महाराष्ट्राच्या विकासासाठी..* फडणवीस सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाचा लेखाजोखा, उद्या दिवसभर सरकार आणि विरोधकांचं एबीपी माझावर घमासान

माझा विशेष : हफ्तेखोरीमुळेच फेरीवाल्यांना अभय मिळतंय का?, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता @abpmajhatv वर

BLOG : कविता ननवरे यांचा विशेष ब्लॉग, निवडून येतात, सहीच्या मालकीणी होतात.. https://goo.gl/Qit4kM

BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा विशेष ब्लॉग, इंदिराजी .... काही आठवणी ... https://goo.gl/Fujckp

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर