1. सरकार प्रस्तावाच्या नावाखाली फसवणूक करतंय, अण्णा हजारेंचा मोदी सरकारवर आरोप https://t.co/MlKlYoN5ZK तर अण्णांसोबत चर्चेसाठी राज्यातले मंत्री देऊन अपमान होतोय, माजी खासदार नाना पटोलेंची टीका https://t.co/hr1klzlHYo


 

  1. उंदीर घोटाळ्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाभोवती चहा घोटाळ्याचं वादळ, 2015 पासून कार्यालयातील चहा-अल्पोपहारावर दुपटीने खर्च केल्याचा संजय निरुपम यांचा आरोप https://goo.gl/VbhxX1


 

  1. चार वर्षांपासून राज्यात उंदरांचा सुळसुळाट, उंदीर घोटाळ्यावरुन राधाकृष्ण विखे पाटील यांची विधानसभेत तुफान फटकेबाजी https://goo.gl/9kmwFu


 

  1. संभाजी भिडेंवरील खोटे गुन्हे मागे घ्या, राज्यभरात धारकरी रस्त्यावर, तर भिडेंच्या अटकेपर्यंत लढा सुरुच ठेवण्याचा प्रकाश आंबेडकरांचा सोलापुरात निर्धार https://goo.gl/ZFAKCT


 

  1. मुंबईत गेल्या पाच वर्षात बलात्काराच्या घटना दुपटीने वाढल्या, 72 टक्के पीडित मुली अल्पवयीन, माहिती अधिकारात मुंबई पोलिसांचे धक्कादायक खुलासे https://goo.gl/rEBesF


 

  1. पेपर फुटीचं ग्रहण सेंट्रल बोर्डाला, सीबीएसई बोर्डाचे दोन पेपर फुटले, दहावीचा गणित, तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा होणार https://goo.gl/EqXqwT


 

  1. एक दिवस भारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल, सुप्रीम कोर्टाचे खडे बोल, घनकचरा व्यवस्थापनाचे नियम लागू करण्यासाठी सर्व राज्यांना चार दिवसांचं अल्टीमेटम https://goo.gl/i5y4T5


 

  1. गोव्यात राज्याबाहेरच्या रुग्णांवर मोफत उपचार नाही, आरोग्य मंत्री निर्णयावर ठाम, तळकोकणातील गरजू रुग्णांचे हाल होणार https://goo.gl/787xYF


 

  1. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी तृतीयपंथीय एकवटले, नागपुरात आंदोलनाला सुरुवात, पुढचे दहा दिवस उपोषण https://goo.gl/4hZCyW


 

  1. अमेरिकेत पाकिस्तानची बेअब्रू, वॉशिंग्टनमधील जे.एफ.केनेडी विमानतळावर पाक पंतप्रधानांचे कपडे उतरवले, पाकिस्तानमध्ये संतापाची लाट https://goo.gl/kqh9EU


 

  1. नागराजच्या 'सैराट'ची पाकिस्तानात हवा, पहिल्या फिल्म फेस्टिव्हलसाठी एकमेव मराठी सिनेमाची निवड, 'बाहुबली'सह एकूण नऊ सिनेमे झळकणार https://goo.gl/honz6Q


 

  1. नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा राजकीय आखाडा होऊ नये, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावे मेसेज व्हायरल https://goo.gl/MJqSYb


 

  1. काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानचा फैसला 5 एप्रिलला, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलमही आरोपीच्या पिंजऱ्यात https://goo.gl/hHCR3K


 

  1. 62 वर्षीय विजय मल्ल्या तिसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत, गर्लफ्रेण्ड पिंकी लालवानीसोबत विवाहबंधनात अडकणार https://goo.gl/Wmw14J


 

  1. बॉल टॅम्परिंग प्रकरणात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर 12 महिन्यांसाठी, तर बेनक्रॉफ्टवर 9 महिन्यांसाठी बंदी, ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांची माहिती https://goo.gl/WmKdkt


 


माझा विशेष : निलंगेकरांवर एवढी मेहेरबानी कशासाठी?, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता @abpmajhatv वर

BLOG : लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग-अभ्यासकाचे जाणे! https://t.co/1V9Yn2r4b4

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा