एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20.04.2018
1. सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात उपराष्ट्रपतींकडे महाभियोगाची नोटीस, 64 खासदारांच्या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या https://goo.gl/CKwenf
2. गुजरातच्या नरोदा पाटिया प्रकरणात माया कोडनानी निर्दोष तर बाबू बजरंगीला जन्मठेप, गुजरात हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय https://goo.gl/tM47mH
3. 26/11 हल्ल्यातील आरोपी अबु जुंदालविरुद्धच्या खटल्याला स्थगिती, काही खास कागदपत्रं बचावपक्षाला देण्यास दिल्ली पोलिसांनी आक्षेप घेतल्याने 11 जूनपर्यंत सुनावणी तहकूब करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश https://goo.gl/gVqqS6
4. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, मुंबईत कोट्यवधीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश http://abpmajha.abplive.in/live-tv
5. एसटीचा तोटा भरुन काढण्यासाठी भरभक्कम भाडेवाढीचा प्रस्ताव, शिवशाहीसह इतर सेवांचं तिकीट 15 टक्क्यांनी महागणार https://goo.gl/qkndEd
6. नाशिककरांचं विमान जमिनीवरच, तांत्रिक कारणामुळे आणखी 8 दिवस उड्डाण लांबणीवर, उद्घाटनाच्या मुहूर्तालाच खोळंबा http://abpmajha.abplive.in/live-tv
7. आमदार विनायक मेटेंसाठी शासकीय खर्चातून 20 लाखांची कार खरेदी, अर्थखात्याच्या नकारानंतरही चंद्रकांत पाटलांची मेटेंवर मेहरबानी https://goo.gl/RhH49T
8. 'टाइम'च्या प्रभावी व्यक्तींमध्ये पंतप्रधान मोदींना स्थान नाही, ट्रम्प, जिनपिंगसह शेख हसिना यांचाही समावेश, 100 जणांच्या यादीत फक्त चार भारतीय https://goo.gl/guZxyJ
9. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेने फेटाळला, एमआयएम नगरसेवकांच्या प्रस्तावाला भाजप-शिवसेनेचा विरोध https://goo.gl/piZnd6
10. मिरा-भाईंदर शहरातील कुख्यात डॉन तात्या पटेल अखेर पोलिसांच्या जाळ्यात, दीड वर्षापासून फरार असलेल्या तात्या पटेलवर पन्नासहून अधिक गुन्हे https://goo.gl/pPKqUP
11. प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने तरुणाने कंपनीच्या तिजोरीतील पाच लाख रुपयांच्या नोटा जाळल्या, मध्यप्रदेशच्या सीहोरमधील घटना, आरोपी जितेंद्र गोयल अटकेत https://goo.gl/pnshPk
12. साताऱ्यातील मांढरदेवी गडावर झालेल्या तरुणीच्या हत्येचा पाच दिवसांनी उलगडा, मुंबईतील तरुणीचा प्रियकरानेच खून केल्याचं तपासात उघड https://goo.gl/Mme5Gv
13. मुंबईतील दादरमध्ये झाड अंगावर पडून 38 वर्षीय दिनेश सांगळेचा दुर्दैवी मृत्यू, सांगळे कुटुंबीयांवर शोककळा https://goo.gl/Lr3dYi
14. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर राज्यभर महाश्रमदान अभियान, अभिनेता आमिर खानची माहिती, पानी फाऊंडेशनच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न http://abpmajha.abplive.in/live-tv
15. 'ऑक्टोबर' चित्रपटानं कथा चोरली, 'आरती' या मराठी सिनेमाच्या दिग्दर्शिका सारिका मेनेचा आरोप, शूजित सरकारला नोटीस https://goo.gl/HgE2sE
माझा विशेष : महाभियोगाच्या राजकारणावरुन विरोधक न्यायसंस्थेसा वेठीला धरतायत? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, ‘एबीपी माझा’वर
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा