एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 ऑगस्ट 2019 | सोमवार
1. पूरग्रस्तांना दिलासा, एक हेक्टरवरील पूरग्रस्त शेतीचं पीककर्ज माफ, कोसळलेल्या घरांचीही पुनर्बांधणी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2. कोहिनूर मिलप्रकरणी राज ठाकरेंना ईडीची नोटीस, 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश मनसे कार्यकर्ते आक्रमक, ठाणे बंदचा इशारा
3. ईडी स्वतंत्रपणे काम करते, आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही, राज ठाकरेंना पाठवलेल्या नोटीशीप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
4. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 98 टक्के मतदान, शिवसेनेचे अंबादास दानवे तर आघाडीचे बाबुराव कुलकर्णी रिंगणात
5. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना अमिताभ बच्चन यांच्याकडून 51 लाखांची, तर रिलायन्स इंडस्ट्रीजकडून 5 कोटींच्या मदत, मुख्यमंत्र्यांकडून बिग बींना धन्यवाद
6. रत्नागिरीत डोंगराला 10 ते 15 फूट खोल आणि रुंद भेगा, गावकरी भयभीत
7. महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांकडून जम्मू-काश्मीरमध्ये विद्येचा प्रसार होण्याची शक्यता, पुण्यातील शैक्षणिक संस्थांचा पुढाकार
8. धुळ्यात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, 15 जणांचा मृत्यू तर जखमींचा आकडा 35 वर, जखमींवर शहादा आणि धुळ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार
9. डोंबिवलीत 'मिशन मंगल'चा शो सुरु असताना चित्रपटगृहाचं सिलिंग कोसळलं, महिला आणि लहान मुलगी जखमी
10. मुंबई-पुणे रेल्वे सेवा आजपासून पूर्ववत, सर्व गाड्या वेळापत्रकानुसार धावणार
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK